ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोणने विमानतळावर कापला वाढदिवसाचा केक, पापाराझींचे मानले आभार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 1:13 PM IST

Deepika cut birthday cake at airport : दीपिका पदुकोण तिचा अभिनेता पती रणवीर सिंगसोबत विमानतळावर दिसली. विमान प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी तिने पापाराझींसोबत फोटो काढले आणि केकही कापला.

Deepak cut the cake
दीपिका पदुकोणने विमानतळावर कापला वाढदिवसाचा केक

मुंबई - Deepika cut birthday cake at airport : अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे निर्विवादपणे मनोरंजन उद्योगातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. जेव्हाही ते एकत्र बाहेर पडतात तेव्हा ते सहजतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. 5 जानेवारी रोजी पार पडलेल्या दीपिका पदुकोणच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी पहाटे मुंबई विमानतळावर या जोडप्याला पापाराझींनी गाठले. यावेळी दीपिकाने विमानतळावरच केक कापला आणि पापाराझींसोबत तिचा खास दिवस साजरा केला.

अलीकडे अपलोड झालेल्या पापाराझी व्हिडिओमध्ये, आपण दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मुंबई विमानतळावर त्यांच्या कारमधून बाहेर पडताना पाहू शकतो. ते गेटच्या दिशेने जात असताना, एक पापाराझी हातात एक छोटासा केक घेऊन त्यांच्याजवळ पोहोचला. चोहऱ्यावर स्मितहास्य ठेवत दीपिकाने आनंदाने केक कापला तर पापाराझी आणि रणवीर सिंग यांनी वाढदिवसाचे पारंपरिक गाणे गायले.

केक कटिंग सेलिब्रेशननंतर, दीपिका आणि रणवीरने प्रवेशद्वाराकडे जाण्यापूर्वी फोटोग्राफर्सशी थोडक्यात संभाषण केले. विमानतळावर फेरफटका मारताना जोडपे हातात हात घालून चालताना दिसले. निरोप घेण्याआधी त्यांनी पापाराझींसाठी काही फोटोंसाठी पोझ देण्यासाठी थोडा वेळ दिला.

दीपिका एका स्टायलिश फुल-लेन्थ ब्लॅक हुडी ड्रेसमध्ये जबरदस्त आकर्षक दिसत होती, तिने मॅचिंग शूज, सनग्लासेस, नटीनेटके केस, हँडबॅगसह उत्तम प्रकारे स्वतःला सजवले होते. दुसरीकडे, रणवीर सिंगने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, हिरवी पँट आणि लांब काळा कोट परिधान केला होता. काळी बेसबॉल कॅप, गडद सनग्लासेस आणि पांढर्‍या स्नीकर्ससह त्याने आपला लूक पूर्ण केला होता.

दीपिकाने 5 जानेवारी 2024 रोजी तिचा 38 वा वाढदिवस पती रणवीर सिंगसोबत इंटिमेट डिनरसह साजरा केला. या दिवशी जोडप्याने लो प्रोफाइल राहणे पसंत केले आणि ते मुंबईतील ताज कुलाबा येथून निघताना त्यांच्या कारमध्ये प्रवेश करताना दिसले. कामाच्या आघाडीवर, दीपिका 'फायटर' या थरारक एरियल चित्रपटामध्ये हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही भूमिका असलेला हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय, दीपिका पदुकोण प्रभास स्टारर 'कल्की २८९८ एडी' आणि रोहित शेट्टीच्या 'सिंघम'मध्येही मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यामध्ये तिने शक्ती शेट्टी ही व्यक्तिरेखा साकारली आहे.

हेही वाचा -

  1. गोल्डन ग्लोब्सचा होस्ट जो कोयच्या विनोदामुळे नाराज झाली टेलर स्विफ्ट
  2. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे विवाहविधी उदयपूरमध्ये सुरू
  3. बॉलिवूड सेलेब्रिटींनी चालवली लक्षद्वीप मोहीम, दिग्गज स्टार्सनी केले भेटीचे आवाहन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.