ETV Bharat / entertainment

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना फेब्रुवारीमध्ये करणार साखरपुडा?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 2:50 PM IST

Rashmika-Vijay Deverakonda : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, अभिनेता विजय देवराकोंडासोबत फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा करत असल्याचं समजतं आहे. सध्या सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाल्या आहेत.

Rashmika-Vijay Deverakonda
रश्मिका-विजय देवरकोंडा

मुंबई - Rashmika-Vijay Deverakonda : नॅशनल क्रश म्हटलं जाणार्‍या अभिनेत्री रश्मिका मंदान्नासाठी करिअरच्या दृष्टीनं 2023 वर्ष हे खूप विशेष होते. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात तिनं रणबीर कपूरची पत्नी गीतांजलीची भूमिका साकरली. या चित्रपटामधील रश्मिकाचा अभिनय हा अनेकांना आवडला. रश्मिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच सेटल होण्याच्या तयारीत आहे. रश्मिका आणि विजय फेब्रुवारीमध्ये साखरपुडा करू शकतात. या बातमीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. साऊथचा सुपरस्टार विजय देवराकोंडा सतत चर्चेत असतो. त्याची गर्लफ्रेंड रश्मिका मंदान्ना आणि तो अनेकदा एकत्र दिसतात.

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्नाची प्रेमकहाणी : विजय देवराकोंडानं रश्मिका मंदान्नासोबत 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' या दोन साऊथ चित्रपटामध्ये काम केलं आहे. त्यांचा 'गीता गोविंदम' हा चित्रपट अनेकांना आवडला होता. हा चित्रपट 15 ऑगस्ट, 2018 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामधील गाणीही खूप हिट झाली होती. या चित्रपटामध्ये चाहत्यांनी रश्मिका आणि विजयची जोडी खूप पसंत केली होती. यानंतर या जोडप्याच्या नात्याबद्दलच्या बातम्या येऊ लागल्या. आता रश्मिका मंदान्नानं बॉलिवूडमध्ये 'अ‍ॅनिमल' चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता ती बॉलिवूडमधील अनेक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत.

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाचं वर्कफ्रंट : रश्मिका मंदान्नाचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात रश्मिकासोबत रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओलही होते. 'अ‍ॅनिमल' चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवरून 800 कोटींहून अधिक कमाई केली आहे. रश्मिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय ती 'इंद्रधनुष्य', 'द गर्लफ्रेंड' आणि 'छावा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे विजय देवराकोंडानं 'लायगर' या बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केलं होतं, मात्र त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर फ्लॉप झाला. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अनन्या पांडे दिसली होती. विजय शेवटी 'कुशी' या चित्रपटामध्ये दिसला. आता तो लवकरच 'फॅमिली स्टार' आणि दिग्दर्शक गौतम तिन्ननुरीच्या 'व्हीडी 12'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. राजकारणातला 'मातोश्री' हा अजिंक्यतारा, किरण मानेंची सोशल मीडियातील पोस्ट चर्चेत
  2. नवविवाहित अरबाज खान आणि शुरा खान झाले स्पॉट, फोटोसाठी लाजली नवी नवरी
  3. दीपिका पदुकोणने विमानतळावर कापला वाढदिवसाचा केक, पापाराझींचे मानले आभार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.