Aryan Khan turns 26 : 'बिग ब्रदर आणि बेस्ट फ्रेंड' म्हणत आर्यन खानला सुहानानं दिल्या वाढदिवसाच्या सदिच्छा

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Nov 13, 2023, 3:15 PM IST

Aryan Khan turns 26

Aryan Khan turns 26 : शाहरुखची लेक सुहाना खाननं रविवारी तिच्या सोशल मीडियावर भाऊ आर्यन खानसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या भावासोबत एक थ्रोबॅक चित्र शेअर केले आणि त्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली.

मुंबई - Aryan Khan turns 26 : सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची मुलं सुहाना खान आणि आर्यन खान यांच्यातील भाऊ बहिणींचं नातं खूप सुंदर आहे. 12 नोव्हेंबर रोजी आर्यनच्या 26 व्या वाढदिवसानिमित्त सुहानानं त्याला प्रेमळ शुभेच्छा दिल्या. त्याचा हा खास दिवस साजरा करण्यासाठी तिनं आर्यनसोबतच्या तिच्या नॉस्टॅल्जिक फोटोसह एक मनापासून लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे.

Aryan Khan turns 26
आर्यन खानला सुहानानं दिल्या वाढदिवसाच्या सदिच्छा

सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर मागील वर्षातील तिच्या आठवणीतील एक फोटो पुन्हा पोस्ट केलाय. फोटोत ती तिचा मोठा भाऊ आर्यन खानच्या शेजारी बसलेली दिसत आहे. आवडत्या श्वानासोबतच्या या फोटोत मोकळेपणाने हसत दोघेही कॅमेऱ्याला लूक देताना दिसतात. ''सुहानानं 12 नोव्हेंबर 2022 च्या आठवणींना उजाळा देताना माझ्या 'बिग ब्रदर आणि बेस्ट फ्रेंड'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा'', असं कॅप्शन देत शुभेच्छा दिल्या.

सुहानाला नाटकांची आवड आहे. अनेक नाटकांमध्ये सहभागी झाल्यानंतर ती आता झोया अख्तरनं दिग्दर्शित केलेल्या द आर्चीज चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट त्याच नावाच्या लोकप्रिय कॉमिक मालिकेची भारतीय आवृत्ती आहेय या चित्रपटात खुशी कपूर, अगस्त्य नंदा, मिहिर आहुजा, युवराज मेंडा, डॉट आणि वेदांग रैना देखील आहेत. हा सिनेमा या वर्षी ७ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

दरम्यान आर्यनला अभिनयापेक्षा चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात अधिक रस आहे. त्यानं कभी खुशी कभी गम या चित्रपटात शाहरुखच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. 'द लायन किंग'मधील द इनक्रेडिबल्स आणि सिम्बाच्या हिंदी डबसाठीही त्यांनं आपला व्हाईस ओव्हर दिला आहे. तो सध्या स्टारडम नावाच्या ओटीटी मालिकेचा दिग्दर्शक म्हणून काम करत आहे.

आर्यन खानवर गेल्या वर्षी ड्रग बाळगल्याच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर त्याच्याबद्दल फिल्म इंडस्ट्रीत मोठी सहानुभूती निर्माण झाली होती. या प्रकरणात त्याला गोवण्यात आल्याची चर्चा होती. नंतर त्याला जामिनावर मुक्त करण्यात आलं. त्याच्यासाठी हा अनुभव खूप भयंकर होता. तेव्हापासून त्यानं सार्वजनिक ठिकाणी वावरताना खूप सावधगिरी बाळगली आहे.

हेही वाचा -

  1. Big B Diwali wishes : अमिताभ बच्चनची जलसामध्ये प्रार्थना, दिवाळी निमित्त दिल्या शुभेच्छा

2. Siddharth Kiara first Diwali : स्टार कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची पहिली रोमँटिक दिवाळी

3. Masaba Diwali With Viv Richards : मसाबानं वडील व्हिव्हियन रिचर्ड्ससोबत साजरी केली यंदाची दिवाळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.