ETV Bharat / entertainment

Siddharth Kiara first Diwali : स्टार कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची पहिली रोमँटिक दिवाळी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 12:18 PM IST

Siddharth Kiara first Diwali : स्टार कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी लग्नानंतरची पहिली दिवाळी रोमँटिक पद्धतीनं साजरी केली. सोशळ मीडियावर शेअर केलेल्या फोटोत दोघेही दिवे आणि फुलांनी सजवलेल्या त्यांच्या गच्चीवर सुंदर पोज देताना दिसत आहेत. या फोटोवर चाहते उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत.

Siddharth Kiara first Diwali
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची पहिली दिवाळी

नवी दिल्ली - Siddharth Kiara first Diwali : स्टार कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या दिल्लीतील घऱी लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी केली. इन्स्टाग्रामवर झळकलेल्या एका फोटोत दोघे दिवे आणि फुलांनी सजवलेल्या त्यांच्या गच्चीवर सुंदर पोज देताना दिसत आहेत.

फोटोत सिद्धार्थ मागून कियाराला मिठी मारताना दिसत आहे. या जोडप्याने केवळ त्यांच्या रोमँटिक फोटोने नाही तर दिवाळीत परिधान केलेल्या पारंपरिक वेशभूषेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. दोघेही पांढऱ्या रंगाच्या मॅचिंग कपड्यात दिसत आहेत. सिद्धार्थने पांढरा कुर्ता घातला होता, तर कियाराने पांढरा सूट निवडला होता.

सिद्धार्थ आणि कियाराच्या या दिवाळी फोटोला चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकजण त्यांच्या या फोटोचे कौतुक करत आहेत. याआधी रविवारी, कियाराने इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसह सिद्धार्थला दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या होत्या.

सिद्धार्थ आणि कियारा यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये एका समारंभात लग्न केले. 'शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर 2022 मध्ये सिद्धार्थ आणि कियारा कॉफी विथ करण सीझन 7 च्या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये दिसले होते. यामध्ये करण जोहरने त्यांना पहिल्यांदा त्यांच्या रिलेशनशीपबद्दल भाष्य केलं होतं. कियारानं यावेळी बोलताना सिद्धार्थ हा आपल्यासाठी मित्रांपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं होतं. यावेळी सिद्धार्थनंही तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करीत होकार दिला होता. लग्नानंतर त्यानं "अब हमारी परमनंट बुकिंग होगी." असं म्हत फोटो शेअर केले होते.

कामाच्या आघाडीवर सिद्धार्थ त्याच्या आगामी 'योद्धा' चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय, तो आगामी 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सिरीजमधून डिजिटल पदार्पण करणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या मालिकेत विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत आहेत. प्राईम व्हिडिओवर ही मालिका प्रसारित होणार आहे. कियारा आगामी 'गेम चेंजर' चित्रपटामध्ये 'RRR' अभिनेता राम चरण आणि हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआरसोबत अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'वॉर 2' मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. Masaba Diwali With Viv Richards : मसाबानं वडील व्हिव्हियन रिचर्ड्ससोबत साजरी केली यंदाची दिवाळी

2. Arpita Khan Diwali Bash : शाहरुख खानच्या उपस्थितीनं सलमान खानच्या बहिणीच्या दिवाळी सेलेब्रिशनची शोभा वाढली

3. Tiger 3 X Review : दिवाळीत 'टायगर'ची गर्जना; चाहत्यांकडून समाज माध्यमांत कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.