ETV Bharat / entertainment

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव 'स्त्री 2' च्या शूटिंगसाठी मध्य प्रदेशला रवाना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 2:07 PM IST

Stri 2 team leaves for shooting
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव

Stri 2 team leaves for shooting : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर पापाराझींना दिसले. स्त्री 2 च्या शूटिंगसाठी चित्रपटाची टीम मध्य प्रदेशला रवाना झाली. यामध्ये या दोघांचाही समावेश होता.

मुंबई - Stri 2 team leaves for shooting : अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर 'स्त्री 2' चित्रपटाच्या शूटिंगसाठी मध्य प्रदेशला रवाना झाले आहेत. 'स्त्री' या यापूर्वी हॉरर-कॉमेडी चित्रपटानं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं होतं. या चित्रपटाचा सीक्वेल बनणार याचे संकेत पहिल्या चित्रपटाच्या अखेरीस मिळाले होते. त्यानंतर गेली पाच वर्षे प्रेक्षक पुढील भागाची प्रतीक्षा करत होते. अखेरीस गेल्या जुलै महिन्यात निर्मात्यांनी 'स्त्री 2' चे शूटिंग सुरू केल्याची घोषणा केली होती. त्यावेळी चित्रपटाची थीम उघड करणारा एक व्हिडिओ देखील जारी केला होता. 'स्त्री 2' च्या शूटसाठी निघालेल्या या चित्रपटातील कलाकारांना शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर पापाराझींनी क्लिक केले.

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांना शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. यावेळी श्रद्धा पारंपरिक लूकमध्ये दिसली. तिनं साधा प्रिंटेड कुर्ता सेट परिधान केला होता. तिने तिच्या पारंपारिक पोशाखाला साजेशी ऑफ-व्हाइट बॅग आणि मॅचिंग कोल्हापुरी चप्पल घातली होती. श्रद्धानं कॅमेऱ्याकडे पाहून स्माईल दिलं आणि विमानतळाकडे निघून गेली. यावेळी प्रवास करताना राजकुमार रावनं सैल ट्रॅक पॅंट आणि बेसबॉल कॅपसह जोडलेल्या काळ्या टी शर्टचा पर्याय निवडला. त्यानं तपकिरी स्नीकर्ससह आपला लूक बनवला होता.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला राजकुमारनं मध्य प्रदेशातील चंदेरी येथे एक गल्ली दाखवणाऱ्या एका व्हिडिओची झलक टाकली होता. व्हिडिओमध्ये, एका भिंतीवर सुरुवातीला 'ओ स्त्री कल आना' असा संदेश प्रदर्शित केला होता. नंतर हा संदेश बदलला आणि 'ओ स्त्री रक्षा करना' असा झाला. 'सरकटे का आतंक' ही थीम 'स्त्री 2' ची असल्याचं यावेळी स्पष्ट झालं होतं.

अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री 2' चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओ आणि दिनेश विजन मॅडॉक फिल्म्स यांच्या मार्फत केली जात आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्याशिवाय अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी देखील 'स्त्री 2' या हॉरर कॉमेडी सिक्वेलमध्ये दिसणार आहेत. 2018 च्या स्त्री चित्रपटाचा सीक्वेल चित्रपट आहे.

1. बॉबी देओलसोबत 'बदतमीज दिल' गाण्यावर थिरकल्यानंतर रणबीर कपूरनं केली 'ही' विनंती
2. अखेर प्रतीक्षा संपली! कंतारा : चॅप्टर 1 चा फर्स्ट लूक होणार लॉन्च

3. 'टायगर 3'च्या यशानंतर सलमान खानच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.