ETV Bharat / entertainment

अखेर प्रतीक्षा संपली! कंतारा : चॅप्टर 1 चा फर्स्ट लूक होणार लॉन्च

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 12:01 PM IST

Kantara: Chapter 1 first look to be launched : कंतारा चित्रपटाच्या प्रीक्वेलचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी तयारी केली आहे. ऋषभ शेट्टीनं मुख्य भूमिका आणि दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचं शीर्षक कंतारा : चॅप्टर 1 असणार आहे.

Kantara: Chapter 1 first look to be launched
कंतारा : चॅप्टर 1 चा फर्स्ट लूक होणार लॉन्च

मुंबई - Kantara: Chapter 1 first look to be launched : अभिनेता ऋषभ शेट्टीनं दिग्दर्शित केलेल्या 'कंतारा'चा दुसरा भाग तयार होत आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कंतारा' या सुपरहिट चित्रपटाचा हा प्रीक्वेल असणार आहे. या चित्रपटाबद्दलची अपडेट प्रदीर्घ कालावधीनंतर निर्मात्यांनी दिलीय.

'कंतारा : चॅप्टर 1' असं शीर्षक असलेल्या चित्रपटाच्या प्रीक्वेलला फर्स्ट लूक येत्या 27 नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. 'कंतारा' चित्रपटाची यशस्वी निर्मिती केलेल्या होंबाळे फिल्म्सनं ही बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली. "भूतकाळातील पवित्र प्रतिध्वनी ऐकण्यासाठी पाऊल उचला, ज्यातील प्रत्येक फ्रेममध्ये देवत्व विणलंय. अदृश्यतेची झलक पाहण्यासाठी मंत्रमुग्ध रहा!" त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.

'कंतारा' चित्रपटाच्या प्रीक्वेलची तयारी या वर्षाच्या सुरुवातीला झाली. 'कंतारा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींची कमाई केल्यानंतर ऋषभ शेट्टीनं प्रीक्वेलची घोषणा केली होती. यावेळी ऋषभ म्हणाला होता की, "तुम्ही आता जो पाहिला तो 'कंतारा'चा दुसरा भाग होता. चित्रपटाचा पहिला भाग पुढील वर्षी होईल. 'कंतारा'च्या शूटिंग दरम्यान ही संकल्पना पुढं आली होती कारण कंताराच्या इतिहासाची मूळं खूप खोलवरची आहेत. सध्या आम्ही या चित्रपटाच्या कथेवर काम करतोय. चित्रपटाबद्दलचा तपशील उघड करणं आता घाईचं होईल."

दक्षिण कन्नड या काल्पनिक गावात घडणारं कंताराचं कथानक ऋषभ शेट्टीनं साकारलेल्या व्यक्तिरेखेभोवती फिरतं. ज्यामध्ये एका कंबाला चॅम्पियनचा संघर्ष फॉरेस्ट अधिकाऱ्याशी होताना दिसतो. अस्सल संस्कृतीशी आणि इथल्या प्रथा परंपरा जपणारं कथानक असल्यामुळे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर कंताराशी जोडले गेले. चित्रपटातील प्रसंग, संवाद आणि गाणी खूपच मोहून टाकणारी होती. चित्रपटाच्या क्लायमॅक्सनं तर प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले. या चित्रपटाचं समीक्षकांनी भरपूर कौतुक केलं. बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई करण्यात कंताराला यश आल्यानं निर्मात्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. कंताराचा प्रीक्वेल उत्तम व्हावा यासाठी क्रिएटिव्ह टीम सक्रिय झाली आहे. प्रेक्षकांनाही या नव्या भागात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिलीय.

'कंतारा'च्या प्रक्वेलसह होंबाळे फिल्म्स 'सालार' चित्रपटाची निर्मितीही करत आहे. या वर्षी रिलीज होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट 22 डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर रिलीजसाठी तयार आहे.

हेही वाचा -

  1. 'टायगर 3'च्या यशानंतर सलमान खानच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक जाहीर

2. 'बाळाचा बाप कोण?' हे सांगणारा फोटो शेअर करुन इलियाना डिक्रूझनं केलं चकित

3. अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चन नंदाला मुंबईतील 'प्रतीक्षा' बंगला दिला भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.