ETV Bharat / entertainment

Stree 2 filming : ' पुन्हा एकदा चंदेरीत पसरला आतंक', स्त्री २ च्या शुटिंगला सुरुवात

author img

By

Published : Jul 11, 2023, 3:37 PM IST

स्त्री २ चित्रपटाच्या शुटिंगलामध्ये प्रदेशात सुरूवात झाली आहे. चंदेरीमध्ये पुन्हा एकदा आतंक पसरला, असल्याचे कॅप्शन देत अभिनेत्री श्रद्धा कपूरने शुटिंग सुरू झाल्याचे चाहत्यांना कळवलंय.

Sharing the motion poster of Stree 2
स्त्री २ च्या शुटिंगला सुरुवात

मुंबई - गर्द अंधाऱ्या रात्रीची सुनसान गल्ली. दूरवर जत्रेतला पाळणा दिसतोय. एका बाजूला भिंतीवर हरवलेली माणसं दिसताहेत तर त्याला लागूनच भिंतीवर 'ओ स्त्री कल आना' ही अक्षरे लिहिली आहेत. ही वाक्ये २०१८ ची असल्याचे नंतर टेक्स्टमध्ये दिसते. 'कल आना' ही अक्षरे खोडली जातात आणि त्या ठिकाणी 'रक्षा करना' ही अक्षरे उमटू लागतात. आता स्त्री परत यायला हवी आहे, परंतु ती आता 'रक्षा करण्यासाठी' येण्याचे आमंत्रण तिला २०२४ मध्ये दिलं जातय. नंतर येतात ती 'सरकटे का आतंक' ही अक्षरे. हातात छाटलेले शीर असेलेल वॉल पेंटींग दिसू लागते. हे आहे स्त्री २ चे मोशन पोस्टर. या चित्रपटाचे शुटिंग सुरू झाल्याचे अभिनेत्री श्रद्ध कपूरने आपल्या सोशल मीडियावर सांगितलंय. याला कॅप्शन देताना तिने लिहिलंय, 'पुन्हा एकदा चंदेरीत पसरला आतंक.'

स्त्री हा चित्रपट २०२१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाणी, अपारशक्ती खुराना, फ्लोरा सैनी, नोरा फेतही, कृती सेनॉन, अभिषेक बॅनर्जी, विजय राज असा हरहुन्नरी कलाकारांचा समावेश होता. बॉक्स ऑफिससह प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या या चित्रपटाचा दुसरा सीक्वेल निर्मात्यांनी करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करत आहेत.

चंदेरी हे गाव स्त्री चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या ओळखीचे बनलंय. या गावात शुट करण्यासाठी अलिकडेच श्रद्धा कपूर मुंबईहून रवाना झाली होती. अंधेरी से चंदेरी असे कॅप्शन तिने पोस्टला दिले होते. हे गाव मध्ये प्रदेशात असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले होते. या ठिकाणी आता पुन्हा एकदा बॉलिवूडचे अंधेरीहून कलाकार दाखल झाले आहेत. या चित्रपटाचे कथानक काय असेल यावरचा पडदा अजून उचलला गेला नसला तरी स्त्री पुन्हा एकदा जत्रेच्या निमित्ताने चंदेरीत आली आहे. आणि आता लोक तिला आपले रक्षण करण्याची विनवणी करताना दिसणार असल्याचे संकेत, श्रद्धाने शेअर केलेल्या पोस्टरवरुन दिसत आहे.

हेही वाचा -

१. SPKK Collection : 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री...

२. Baipan Bhari Deva at the box office : भाईपण भारी देवा ठरला ब्लॉकबस्टर, १० व्या दिवशी रचला विक्रम

३. Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने शेअर केला मुलगी मालती मेरीचा सुंदर फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.