ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने शेअर केला मुलगी मालती मेरीचा सुंदर फोटो...

author img

By

Published : Jul 11, 2023, 1:39 PM IST

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनाससोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. अलीकडेच तिने मालतीचा एक मोहक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मालती समुद्राच्या दृश्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा

मुंबई: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा ही सध्या पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनाससोबत सुट्टी घालवत आहे. अलीकडेच प्रियांकाने तिच्या मुलीचा व्हॅकेमधील इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक मोहक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये मालती समुद्राच्या दृश्याना पाहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. मालतीचा हा फोटो फार सुंदर आहे. प्रियांकाने या पोस्टवर लाल हार्ट इमोजीसह 'एंजल' असे लिहले आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा

'एंजल' मालती मेरीचा फोटो : या फोटोमध्ये मालतीने निळ्या लाल फुलांचा मोनोकिनी आणि मॅचिंग कॅपसह सनग्लास घातलेला आहे. या फोटोमध्ये छोटी मालती मेरी फारच गोंडस दिसत आहे. यापूर्वीही प्रियांकाने आपल्या मुलीचे अनेक फोटो पोस्ट केले आहे मात्र हा फोटो फार खास आहे.

मालती मेरीचा जन्म : मालती मेरीचा जन्म जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे झाला होता. प्रियांका आणि निकने एका संयुक्त निवेदनात सोशल मीडियावर त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माची घोषणा केली होती. या घोषणेत त्यांनी लिहले होते की, 'आम्ही सरोगेसीद्वारे बाळाचे स्वागत केले आहे, याची पुष्टी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे आम्ही आदरपूर्वक गोपनीयतेची विनंती करतो. तुमचे खूप आभार' असे त्यांनी म्हटले होते.

हॉलीवूड वॉक ऑफ फेम कार्यक्रम : मालतीने या वर्षी जानेवारीमध्ये प्रियांकासोबत एका कार्यक्रमात गेली होती. 30 जानेवारी रोजी लॉस एंजेलिसमध्ये जोनास ब्रदर्सच्या हॉलीवूड वॉक ऑफ फेम कार्यक्रमात यावेळी मालती मेरी आली होती. एक वर्षाची मालती प्रियांकाबरोबर मांडेवर बसली होती. यावेळी वडील निक जोनास आणि काका केविन हे स्टेजवर होते, त्यामुळे मालती ही तिच्या वडीलांकडे बघत होती. तसेच या कार्यक्रमात निक हा आपल्या मुलीबद्दल आणि पत्नी प्रियांकाबद्दल देखील बोलला होता. ‘सिटाडेल’च्या प्रमोशनच्या वेळी प्रियंका आपल्या लहान मुलीला घेऊन भारतात आली होती. यावेळी प्रियांकाने आपल्या मुलीला मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात नेले होते.

हेही वाचा :

  1. LGM Trailer OUT: कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीच्या 'एलजीएम' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज...
  2. OMG 2 teaser: ओएमजी २ मध्ये पंकज त्रिपाठीची संकटातून सुटका करण्यासाठी अवतरणार अक्षय कुमार
  3. SPKK box office collection day 12 : 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत आहे धमाल...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.