सोनम कपूरच्या पार्टीत डेव्हिड बेकहॅम, किंग खानच्या मन्नत बंगल्यातही लावली हजेरी

सोनम कपूरच्या पार्टीत डेव्हिड बेकहॅम, किंग खानच्या मन्नत बंगल्यातही लावली हजेरी
David Beckham on India tour :जागतिक फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझिलंडचा सामना पाहिल्यानंतर त्यानं सोनम कपूरनं आयोजित केलेल्या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींची भेट घेतली. शाहरुख खाननही त्याच्यासाठी मन्नत बंगल्यामध्ये खास पार्टीचं आयोजन केलं होतं.
मुंबई - David Beckham on India tour : जगातील आजवरचा सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या डेव्हिड बेकहॅमसाठी शाहरुख खाननं मन्नत बंगल्यात खास पार्टीचं आयोजन केलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत मन्नत बंगल्याच्या बाहेर एक आलिशान कार येऊन उभी राहते. कारच्या ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला डेव्हिड बेकहॅम बसल्याचं दिसतं.
-
David Beckham arrives at Mannat ❤️🔥 #ShahRukhKhan #Mannat #DavidBeckham pic.twitter.com/avg3WYLpR1
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) November 16, 2023
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी विश्वचषक 2023 उपांत्य फेरीच्या सामन्याच्यावेळी डेव्हिड बेकहॅम व्हीव्हीआयपी म्हणून वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता. यावेळी मैदानावर तो सचिन तेंडूलकरसोबत सामनन्याचा आनंद घेताना दिसला. सामना संपल्यानंतर तो विराट कोहलीचं अभिनंदन करताना दिसला होता. या सामन्याच्या दरम्यान तो फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांना भेटला. सर्वांनी त्याचं भारतात स्वागत केलं आणि त्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रणही दिलं होतं.
सामन्यानंतर बुधवारी रात्री अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी बेकहॅमसाठी एक पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींनी हजेरी लावली आणि डेव्हिड बेकहॅमची भेट घेतली. आदित्या ठाकरेंनेही आपल्या भावासोबत या पार्टीला हजरी लावली होती. याशिवाय अंबानी कुटुंबीयानंही त्याला भेटून 7 नंबर असलेली मुंबई इंडियन्सची जर्सी भेट म्हणून दिली. प्रतिष्ठित क्लब मँचेस्टर युनायटेडसाठी बेकहॅमने सात क्रमांकाची जर्सी परिधान करुन खेळत होता.
बेकहॅम हा युनिसेफचा सदिच्छा दूत म्हणून कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला आणि मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि क्रिकेटच्या माध्यमातून लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी युनिसेफसोबत भागीदारी केली आहे.
दुसरीकडे, डेव्हिड बेकहॅम हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. त्याने राष्ट्रीय स्तरावर इंग्लंडचे प्रतिनिधित्व केलं आहे आणि 1996-2009 पर्यंत 100 हून अधिक सामने खेळले आहेत. मिडफिल्डर म्हणून त्याच्या उत्तुंग कारकिर्दीत त्यानं मँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद, एसी मिलान, पॅरिस सेंट जर्मेन आणि एलए गॅलेक्सी यासारख्या प्रतिष्ठित फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व केलंय. या क्लबसह त्यानं प्रीमियर लीग, ला लीगा, लीग 1 आणि यूईएफए चॅम्पियन्स लीग विजेतेपदे यासारखे प्रतिष्ठित खिताबही जिंकले आहेत.
हेही वाचा -
