Koffee With Karan 8: करणच्या चॅट शोमध्ये 'नणंद भावजयी'ची जोडी : रॅपिड-फायर प्रश्नांनं उडवली धमाल

Koffee With Karan 8: करणच्या चॅट शोमध्ये 'नणंद भावजयी'ची जोडी : रॅपिड-फायर प्रश्नांनं उडवली धमाल
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि आलिया भट्ट ही नणंद भावजयीची जोडी कॉफी विथ करणच्या नवीन एपिसोडमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये करणनं विचारलेल्या रॅपिड-फायर प्रश्नांची उत्तरं दोघींनीही खूप मिश्किल दिली आहेत.
मुंबई - निर्माता दिग्दर्शक करण जोहर होस्ट करत असलेल्या 'कॉफी विथ करण' या शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये करीना कपूर खान आणि आलिया भट्ट झळकले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली दृष्टिकोन शेअर केली आणि मतं व्यक्त केली आहेत.
शोच्या बहुप्रतीक्षित रॅपिड-फायर राऊंडमध्ये आलिया भट्ट आणि करीनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणनं केला. त्यानं आलियाला विचारलं की ती दीपिका पदुकोणला आपली स्पर्धक मानते का? अर्थातच प्रत्युत्तरात आलियाने नम्रपणे 'नाही' म्हटलं आणि दीपिकाला इंडस्ट्रीतील तिची 'सिनियर' मानत असल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, ''तसं अजिबात नाही. तसं का असेल? ती माझी सिनीयर आहे. तिच्याशी कोणतीही स्पर्धा नाही.''
रॅपिड-फायर राऊंडमध्ये करण जोहरनं करीनाला विचारलं की ती सारा अली खानच्या आईची भूमिका करु शकते का? ती हजरजबाबी उत्तर देताना म्हणाली की, ''करण जोहरने संधी दिल्यास सारा अली खानची आई पडद्यावर साकारण्याची तिची इच्छा आहे. ही संधी ती कशी सोडेल,'' असं म्हणाली. करीना म्हणाली की, "मी एक अभिनेत्री आहे आणि मी सर्व वयोगटात भूमिका करू शकते. अर्थात ती भूमिका चांगली असेल तर."
करण जोहरने होस्ट केलेल्या 'कॉफी विथ करण' सीझन 8 मध्ये यापूर्वी रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, सनी देओल-बॉबी देओल आणि सारा अली खान-अनन्या पांडे यांसारख्या बॉलिवूडच्या खास जोड्या आल्या होत्या. आगामी एपिसोड्समध्ये काजोल-राणी मुखर्जी आणि अजय देवगण-रोहित शेट्टी यांसारख्या आकर्षक जोडी पाहायला मिळणार आहेत. या शोच्या अखेरच्या एपिसोडमध्ये सलमान खान खानला निमंत्रित केल्याचंही सांगितलं जातंय. त्याच्यासोबत जोडी म्हणून कोण येणार याची अद्याप स्पष्टता नाही. या शोमध्ये येणारी प्रत्येक जोड्या मनोरंजनाच्या सदरातील बातम्यांना भरपूर बातम्या पुरवत आल्या आहेत.
या सीझनमध्ये इम्पोस्टर गेम, कॉफी रेकटॅंगल, क्विज अँड टेल आणि आस्क मी एनीथिंग विथ करण अशा काही रोमांचक सेगमेंट्स पाहायला मिळाल्या. हा शो डिस्ने+ हॉटस्टार स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर दिसत आहे.
हेही वाचा -
