ETV Bharat / entertainment

Rakhi Sawant files case : राखी सावंतने मैत्रिणीविरोधात केली मानहानीची तक्रार दाखल....

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 1:49 PM IST

Rakhi Sawant files case : राखी सावंतने तिच्या खास मैत्रिणीविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. राजश्री मोरेनं राखीच्या चारित्र्यावर असभ्य टिप्पणी केल्याबद्दल तिनं हे मोठं पाऊल उचललं आहे.

Rakhi Sawant files case
राखी सावंतने गुन्हा दाखल केला

मुंबई - Rakhi Sawant files case : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीवर सध्या आदिल खान दुर्रानी, राजश्री मोरे आणि शर्लिन चोप्रा अनेक आरोप करत आहे. दरम्यान आता राखीने देखील तिच्या खास मैत्रिणी विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. राखीने राजश्री मोरेवर गंभीर आरोप केले आहेत. राजश्री मोरेनं राखीच्या चारित्र्यावर असभ्य टिप्पणी केल्याबद्दल तिने हे पाऊल उचललं आहे. राखीनं अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत मैत्रिण राजश्री मोरेवर भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (बदनामी), 504 (हेतूपूर्वक अपमान आणि चिथावणी देणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राजश्री मोरेवर झाली केस दाखल : राखीचे राजश्री मोरेसोबत काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. त्यानंतर राजश्रीनं एका पत्रकार परिषदेत राखीवर भाष्य केलं. राखीचे वकील अली काशिफ खान यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, या घटनेचे व्हिडिओ ऑनलाइन उपलब्ध आहेत. दरम्यान रक्षाबंधनाच्या दिवशी राजश्रीनं आदिल खान दुर्रानीला राखी बांधली होती. राखी बांधत असतानाचे तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. राखी अनेकदा आदिल खान आणि राजश्री विषयी मीडियासमोर बोलत असते.

राखीबद्दल ही कमेंट केली : राखी सावंतने शनिवारी तिच्या मैत्रिणीविरोधात 'तिची कुत्र्याशी तुलना' केल्याबद्दल आणि तिच्या चारित्र्याबद्दल अपमानास्पद कमेंट केल्याबद्दल न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली. अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केलेल्या तक्रारीत राखीने नेल आर्ट स्टुडिओ चालवणारी तिची मैत्रिण राजश्री मोरे हिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता राजश्री याप्रकरणी काय करणार हे येणाऱ्या काळात कळेल. तसेच नुकतेच अर्शी खानने देखील राखीला एका मुलाखतीत खडसावले होते. प्रत्येक धर्मात राखी फिरत असल्याचा तिने राखीवर आरोप देखील लावला होता. त्याबरोबर तिने यावेळी आदिल खानचे कौतुक देखील केले होते.

हेही वाचा :

  1. Dream Girl 2 Box Office Collection Day 10: आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' करत आहे बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई...
  2. Gadar २ Success Party : 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीत दिग्गज बॉलिवूड कलाकारांची हजेरी; पाहा व्हिडिओ
  3. Rakhi Sawant On Religion : आदिल खान दुर्रानी आणि राखी सावंतच्या वादावर अर्शी खानची खास मुलाखत...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.