ETV Bharat / entertainment

Rakhi Sawant On Religion : आदिल खान दुर्रानी आणि राखी सावंतच्या वादावर अर्शी खानची खास मुलाखत...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 6:50 PM IST

Rakhi Sawant On Religion : राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांचा वाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे. राखीवर शर्लिन चोप्रा, राजश्री मोरेसह आदिल देखील आरोप करत आहे. दरम्यान आता याप्रकरणी अर्शी खानने आपलं मत मांडलं आहे.

Rakhi Sawant Religion
राखी सावंतचा धर्म

मुंबई - Rakhi Sawant Religion : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. आता राखी नुकतीच उमराहसाठी मक्का येथे गेली होती. त्यानंतर तिने मक्कामधून काही व्हिडिओ आणि फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. तसंच राखी सध्या तिचं नाव फातिमा असल्याचं सांगत आहे. त्यामुळे अनेक यूजर्स तिला ट्रोल देखील करत आहेत. दरम्यान आता एक राखीबाबत बातमी समोर येत आहे. शर्लिन चोप्रा, राजश्री मोरे आणि आदिल खान दुर्रानी यांनी तिच्याबाबत काही खुलासे केले आहेत. याशिवाय अर्शी खानने देखील आता राखी सावंतला खडसावले आहे.

अर्शी खानने केला राखीवर प्रहार : राखी सावंतचा दुसरा पती आदिल दुर्रानी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिच्यावर अनेक आरोप करत आहे. अर्शी खाननेही तिच्यावर धर्म बदलण्याचा आरोप केला आहे. तिला धडा शिकवला पाहिजे, असं म्हटलं आहे. एका मुलाखतीदरम्यान अर्शी खानने म्हटले की, राखी सावंत ख्रिश्चन होती आणि ती हिंदू होती, आता तिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. पुढे तिने सांगितलं की, आदिल खान जे बोलत आहे ते बरोबर आहे. राखीवर रागावत अर्शीने म्हटलंय, की, ती जे करत आहे ते चुकीचं आहे. राखीच्या मैत्रिणीने तिच्यावर आरोप केले असतील तर ते प्रसिद्धीसाठी नसेल, असं तिने सांगितलं.

अर्शी खानने आदिल खानला 'चांगला व्यक्ती' म्हटलं : अर्शी खानने पुढे सांगितले की, 'आदिल जे काही बोलतो, तो विषयावर बोलतो. मी कोणाला बरोबर-अयोग्य म्हणणार नाही. जो बरोबर असेल तोच जिंकेल. याशिवाय राखीकडून आदिलने दीड कोटी रुपये घेतल्या प्रकरणी तिने म्हटलं की, जर त्याने घेतले असेल तर तो परत करेल, आदिल चांगला माणूस आहे. राखी सुद्धा चुकीची नाही पण आदिल जे बोलतो ते बरोबर वाटते. याशिवाय तिने या मुलाखती दरम्यान हे पण सांगितलं की, मी कोणाला सपोर्ट करत नाही. जे सत्य असेल ते मीडियासमोर एक दिवस येईलच, त्यामुळे यावर जास्त काही बोलू शकत नाही. त्यानंतर शेवटी तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल काही संकेत दिले.

हेही वाचा :

  1. OG teaser: पवन कल्याणच्या वाढदिवसानिमित्त 'ओजी'चा टिझर प्रदर्शित...
  2. Jawan day 1 advance booking: शाहरुख खान स्टारर 'जवान'ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली इतकी कमाई ; जाणून घ्या....
  3. Salaar to arrive in November: 'प्रभास'च्या सालारचे रिलीज नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.