ETV Bharat / entertainment

Stree 2 shoot commences : स्त्री २ चे शुटिंग सुरू झाल्याची राजुमार रावने दिली दवंडी, चंदेरीत दिसणार २ भुतांची दहशत

author img

By

Published : Jul 11, 2023, 5:25 PM IST

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेल्या स्त्री २ चित्रपटाचा सीक्वेलच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. स्त्री २ हा चित्रपट ऑगस्ट २०२४ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Stree 2 shoot commences
स्त्री २ चित्रपटाचा सीक्वेलच्या शुटिंगला सुरुवात

मुंबई - बॉलिवूड स्टार राजुमार रावने अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत स्त्री २ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत ही बातमी आपल्या चाहत्यांना कळवलीय. यामुळे चाहत्यांच्या आनंद आणि उत्साहाला जोर आला आहे. 'पुन्हा एकदा चंदेरीमध्ये दहशतीचे वावारण निर्माण झालंय. स्त्रीच्या शुटिंगला सुरूवात झाली असून ती आता ऑगस्ट २०२४ ला येणार आहे', असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय. यावेळी दोन भुतं दहशत निर्माण करणार असल्याचे संकेत या व्हिडिओतून मिळत आहेत.

अमर कौशिक यांनी दिग्दर्शक म्हणून स्वीकारलेल्या स्त्री २ चित्रपटात राजुमार रावसह श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराणासोबत अभिषेक बॅनर्जी मुख्य कलाकार म्हणून झळकणार आहेत. २०२४ मध्ये ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे. राजकुमार रावने व्हिडिओ शेअर करताच त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये भरपूर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री भूमी पेडणेकरने म्हटलंय की, 'हा चित्रपट पाहण्यासाठी मी उतावीळ झाली आहे'. हा एक बहुप्रतीक्षित चित्रपट असल्याची प्रतिक्रिया एका चाहत्याने दिलीय. 'ओ माय गॉड!!! हा सिनेमा पाहण्यासाठी खूच उत्सहित झालोय', असे एकाने म्हटलंय.

स्त्री चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा एप्रिल महिन्यात एका समारंभात करण्यात आली होती. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात एक प्रहसन सादर करण्यात आले होते. अलिकडेच स्त्री २ चित्रपटाच्या स्क्रिप्टचे वाचन करण्यात आले. यासाठी चित्रपटाची संपूर्ण कलाकार टीम हजर होती. अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेला स्त्री हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटात राजकुमार राव आणि अपारशक्ती खुराना यांच्या भूमिका होत्या. गेल्या वर्षी याच जोडीने वरुण धवनच्या 'भेडिया' चित्रपटात कॅमिओ रोल साकारला होता. भेडियाच्या निर्मात्यांनीही चित्रपटाच्या सीक्वेलचीही घोषणा केली आहे.

भेडिया २ लॉन्चिंगच्या कार्यक्रमात वरुण धवनने लोगो जाहीर करताना कोल्ह्याच्या आवाजाची गर्जना करत, आपला उत्साह दाखवला होता. दरम्यान, कामाच्या आघाडीवर राजकुमार राव जान्हवी कपूर आणि श्रीकांत भोल्ला यांच्या मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात भूमिका करणार आहे. यात त्याची जोडी अलाया एफसोबत असेल.

हेही वाचा -

१. SPKK Collection : 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री...

२. Baipan Bhari Deva at the box office : भाईपण भारी देवा ठरला ब्लॉकबस्टर, १० व्या दिवशी रचला विक्रम

३. Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने शेअर केला मुलगी मालती मेरीचा सुंदर फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.