ETV Bharat / entertainment

Naga Chaitanya : नागा चैतन्य स्टारर 'कस्टडी' हा चित्रपट ओटीटीवर 'या' तारखेला होणार प्रदर्शित...

author img

By

Published : Jun 8, 2023, 11:37 AM IST

Naga Chaitanya
नागा चैतन्य

'कस्टडी' चित्रपटात नागा चैतन्य शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'कस्टडी' हा चित्रपट मल्याळम तेलगू तामिळ आणि कन्नड डब्ससह केवळ भारतात नाही तर जगभरातील 240 देशातमध्ये अ‍ॅमेझोन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.

मुंबई : टॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांच्या यादीत साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता नागा चैतन्यचा समावेश आहे. त्याचा अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'कस्टडी'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ९ जून रोजी अ‍ॅमेझोन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. बुधवारी या चित्रपट निर्मात्यांनी याबद्दलची माहिती दिली. 'कस्टडी' चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन दोन्ही प्रभू यांनी केले आहे. 'कस्टडी' हा एक तेलुगु फीचर चित्रपट आहे जो देशभर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नागा चैतन्यसोबत क्रिती शेट्टीही मुख्य भूमिकेत आहे.

अ‍ॅमेझोन प्राईम : मल्याळम आणि कन्नडमध्ये डब केलेल्या तेलगू आणि तमिळसह हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केल्या जाणार आहे, त्यामुळे प्रेक्षक फार आनंदी आहेत. 'कस्टडी' चित्रपटात चैतन्य शिवाच्या भूमिकेत दिसत आहे, तो एका तरुण हवालदाराची भूमिका या चित्रपटात साकारत आहे. राजू नावाच्या खतरनाक गुन्हेगाराला बंगळुरू न्यायालयात नेण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपविण्यात आली असते . शिवा ज्या व्यक्तीला न्यायालयात घेऊन जात आहे ती व्यक्ती एका शक्तिशाली मंत्र्याविरुद्ध कोर्टात साक्ष देणार असतो. त्यामुळे मंत्री या साक्षीदारासह शिवाला ही निशाणा बनविताना दिसतो. अशा परिस्थितीत शिवा हा गुन्हेगाराला कोर्टात नेऊ शकणार की नाही. याचे उत्तर जाणून घेण्यासाठी अ‍ॅमेझोन प्राईमवर हा चित्रपट पहा...

जागतिक स्ट्रीमिंग : या चित्रपटात नागा चैतन्यचा एक वेगळा अवतार पाहायला मिळाणार आहे. याशिवाय चैतन्यने या चित्रपटात खूप छान भूमिका साकारली आहे. तसेच दुसरीकडे, क्रिती शेट्टीने देखील या चित्रपटात फार चांगला अभिनय केला आहे. दरम्यान चित्रपटाचे निर्माते प्रभू यांनी चित्रपटाबद्दल बोलताना म्हटले, 'हे माझ्यासाठी खूप खास आहे, आणि मला आनंद आहे की प्राइम व्हिडिओवर विशेष जागतिक स्ट्रीमिंग प्रीमियरसह, 240 हून अधिक देशात प्रेक्षकांना ते पाहायला मिळेल आणि त्याचा आनंद घेता येईल.

नागा चैतन्य आणि समंथाचा घटस्पोट : समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी जानेवारी 2017 मध्ये हैदराबादमध्ये लग्न केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार गोव्यात लग्नगाठ बांधली. तसेच सामंथा आणि नागा चैतन्यचे फार काळ नाते टिकू शकले नाही. यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये विभक्त होण्याची घोषणा केली. या जोडप्याने वेगळे होण्याचे कारण हे पोस्टमध्ये प्रकट केले नाही. याशिवाय त्यांनी मीडियामध्ये देखील घटस्फोटामागील कारण सांगणे टाळले.

हेही वाचा :

  1. Sonnalli seygall wedding : 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेगलने गुपचूप लग्न केले
  2. Sharwanand's wedding : श्रावाणानंदच्या लग्नात सिद्धार्थने ओये ओये गाताना प्रेक्षकांना केले आश्चर्यचकित
  3. Citadel action training in Serbia : वरुण धवन आणि सिकंदर खेर सिटाडेलसाठी सर्बियामध्ये घेतायत कठोर प्रशिक्षण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.