ETV Bharat / entertainment

Sonnalli seygall wedding : 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेगलने गुपचूप लग्न केले

author img

By

Published : Jun 7, 2023, 5:28 PM IST

प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेगल वयाच्या 34 व्या वर्षी गुपचूप लग्न केले. जाणून घ्या या अभिनेत्री कोणाशी लग्न केले आहे?

Sonnalli Seygall
सोनाली सेगल

मुंबई : बी-टाऊनमध्ये पुन्हा एकदा शहनाई वाजली आहे. लव रंजन दिग्दर्शित 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेगल ही विवाहबंधनात अडकली आहे. या अभिनेत्रीने वयाच्या ३४ व्या वर्षी तिचा प्रियकर आशिष सजनानीसोबत लग्न केले आहे. हा एक खाजगी समारंभ होता ज्यामध्ये अभिनेत्रीच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवार उपस्थित होता. गेल्या सोमवारी सोनालीच्या मेहंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. मेहंदी सेरेमनीच्या कार्यक्रमात काही खास लोकच यावेळी उपस्थित होते. या अभिनेत्रीचे लग्न आज मुंबईत दुपारी झाले. विशेष म्हणजे सोनल्ली आणि आशिष गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर कोण आहे आशिष सजनानी आणि सोनल्लीला तो कुठे भेटला हे जाणून घेण्यासाठी वाचा संपुर्ण बातमी...

सोनाली सेगलचा वर कोण आहे? : मीडिया रिपोर्ट्सवर सोनालीला तिचे लग्न हे मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवायचे होते. त्यामुळेच सोनाली आणि आशिषने अद्याप त्यांच्या नात्याची पुष्टी केली नव्हती. दुसरीकडे, आशिषबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या इन्स्टा बायोवरून असे दिसून येते की तो एक उद्योजक आहे. त्याचे हॉटेल, रेस्टॉरंट, ट्रक डॅडी, क्लासिक कारांचा उद्योग आहे. याशिवाय त्याची ओपा नावाची स्वतःची हॉस्पिटॅलिटी फर्म आहे.

सोनाली करत आहे गुपचूप लग्न : सोनाली मे महिन्यात मित्रांसोबत बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. असे बोलले जात आहे की अभिनेत्री गुपचूप लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित करू इच्छित आहे. सोनालीआणि आशिषच्या नात्याचा खुलासा डिसेंबर 2022 मध्ये झाला होता, मात्र आतापर्यंत या जोडप्याने त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितले नाही. सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, प्यार का पंचनामा आणि या चित्रपटाच्या सिक्वेलशिवाय सोनू के टीटू की स्वीटीमध्ये सोनल्ली कार्तिक आर्यनच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली होती. सोनाली अखेर जय मम्मी दी (2020) या चित्रपटात दिसली होती. याशिवाय, सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिचे इंस्टाग्रामवर फार जास्त प्रमाणात फॉलोवर्स आहे. अनेकदा ती इंस्टाग्रामवरून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

हेही वाचा :

  1. Adipurush final trailer out: आदिपुरुष या चित्रपटाचा फायनल ट्रेलर झाला आऊट
  2. Reminder of my legacy: प्रतीक बब्बरने आडनाव बदलले, जपला स्मिता पाटीलचा वारसा
  3. Neha Singh Rathore : ओडिशा ट्रेन अपघातावर लोकगायिका नेहा सिंग राठौरनेचे नवीन गाणे ट्विटवर व्हायरल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.