ETV Bharat / entertainment

Adipurush final trailer out: आदिपुरुष या चित्रपटाचा फायनल ट्रेलर झाला आऊट

author img

By

Published : Jun 7, 2023, 1:37 PM IST

आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी तिरुपती येथे प्री-रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये चांगल्या आणि वाईट शक्तींमधील युद्ध दाखविले आहे. तसेच या स्क्रीनिंगच्या वेळी प्रभास हा तिरुपतीला उपस्थित होता.

Adipurush final trailer out
आदिपुरुषचा फायनल ट्रेलर झाला आऊट

मुंबई : पौराणिक चित्रपट 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी मंगळवारी तिरुपती येथे या चित्रपटाचा प्री-रिलीज कार्यक्रम घेतला. ओम राऊत दिग्दर्शित, 'आदिपुरुष' हा चित्रपट महाकाव्य रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात प्रभु रामाच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग आहे. तसेच या चित्रपटात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 16 जून रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तिरुपती येथील प्री-रिलीज कार्यक्रमातील ट्रेलरमध्ये राघव आणि वानर सेना जानकीला परत आणण्यासाठी एका विलक्षण प्रवासाला सुरुवात करतो, चित्रपटात वीरता, सामर्थ्य आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाची झलक दाखविल्या गेली आहे.

आदिपुरुष : ट्रेलरमध्ये चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्ष दर्शविला आहे. तसेच अंतिम ट्रेलर आणि पहिल्या ट्रेलरप्रमाणेच लंकेशबद्दल फारसे काही प्रकट होत नाही. ट्रेलरच्या सुरुवातीला सैफ हा वेशांतरात दिसतो आणि त्यानंतर तो प्रभासशी लढताना दिसतो. मंगळवारी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवीन पोस्टरचे अनावरण केले. त्यानंतर प्रोडक्शन हाऊस टी-सीरीजने इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करत लिहिले, 'प्रत्येक भारतीयाचा आदिपुरुष'. अंतिम ट्रेलरचे अनावरण करण्यापूर्वी, मंगळवारी, प्रभास आणि टीम आदिपुरुष यांनी तिरुमला मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचे आशीर्वाद घेतले. तसेच या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर सध्याला व्हायरल झाले आहे. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये, अभिनेता पांढरा कुर्ता-पायजामा घातलेला दिसत शिवाय त्याने लाल रेशमी शाल देखील यावर घेतली आहे. अलीकडेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी राम सिया राम आणि जय श्री राम या दोन गाण्यांचे अनावरण केले, हे गाणे प्रेक्षकांना फार पसंतीला पडले त्यामुळे या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गाणे शेअर केले आणि लिहिले, 'आदिपुरुषाचा आत्मा. राम सिया राम.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

पहिल्यांदा 9 मे रोजी प्रदर्शित झाला होता ट्रेलर : चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरचे 9 मे रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर प्रेक्षकांना हा ट्रेलर फार पसंतीला पडला नाही. खराब व्हीएफएक्समुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चित्रपटाला टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र आता या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रथम खास हैदराबादमध्ये प्रभासच्या चाहत्यांसाठी प्रदर्शित करण्यात आला होता, त्यानंतर मुंबईत एक भव्य लॉन्च कार्यक्रम झाला, ज्यामध्ये स्टार कास्ट, दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थित होते. या चित्रपटाचा ट्रेलर जगभरातील 70 देशांमध्ये रिलीज करण्यात आला होता.

कृती सेननने आपल्या भावना केल्या व्यक्त : अभिनेत्री कृती सेननने जानकीची भूमिका केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी, क्रितीने या चित्रपटात संधी मिळाल्याबद्दल तिचा आनंद व्यक्त करत म्हटले होते की, जी अनेक कलाकारांना मिळत नाही. ते मला मिळाले, 'आज मी खूप भावूक झाले आहे, ट्रेलर पाहून मला आनंद झाला कारण हा फक्त एक चित्रपट नाही तर त्याहूनही खूप काही आहे. हा चित्रपट बनवताना आम्ही जे अनुभवले ते खास होते.' कृतीने तिला संधी दिल्याबद्दल दिग्दर्शक ओम राऊत यांचे आभार मानले आहेत. 'जानकीच्या रूपात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मला ओमचे आभार मानायचे आहेत. तुमचा माझ्यावर विश्वास होता की मी ही भूमिका चांगली करू शकेन कारण असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यात अशी भूमिका मिळत नाही. मी भाग्यवान आहे असे मला वाटते.'सीतेचे पात्र तिच्यासाठी किती खास आहे हे सांगताना ती म्हणाली, 'जानकीमध्ये मी माझे मन आणि आत्मा ओतले आहे. मला या भूमिकेबद्दल खूप आत्मविश्वास होता पण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी या पात्राबद्दल अधिकाधिक शिकले. जानकी ही खूप धार्मिक आहे, दयाळू आत्मा आहे, प्रेमळ हृदय आणि कणखर मन तिचे आहे. तुम्हाला माझ्या पोस्टरमध्ये देखील दिसेल, वेदना आहे, पण भीती नाही. माझ्यासाठी ती खूप मोठी भावना होती. आम्ही फक्त मानव आहोत. जर आम्ही अडखळलो तर आम्हाला क्षमा करा. असे तिने म्हटले होते.

ट्रिबेका फेस्टिव्हल : तसेच याआधी निर्मात्यांनी असेही जाहीर केले होते की आदिपुरुष 13 जून रोजी न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित केला जाईल. याबद्दल प्रभासने प्रीमियरचा उत्साह व्यक्त करत म्हटले होते की, 'आदिपुरुषचा वर्ल्ड प्रीमियर न्यूयॉर्कमधील ट्रायबेका फेस्टिव्हलमध्ये होणार आहे याचा मला सन्मान वाटतो. आपल्या राष्ट्राचे लोकभावन प्रतिबिंबित करणारा चित्रपट बनविणे एक विशेष विशेषाधिकार आहे. आमचा भारतीय चित्रपट पहा, विशेषत: माझ्या अगदी जवळचा चित्रपट, आदिपुरुष, जागतिक स्तरावर पोहोचल्याने मला केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक भारतीय म्हणूनही अभिमान वाटतो. मी ट्रिबेकामध्ये आहे, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.

हेही वाचा :

  1. Lust Stories 2 Teaser : 'लस्ट स्टोरीज २'मध्ये तमन्नासह विजय वर्माची दिसणार केमिस्ट्री, नेटफ्लिक्सवर टीझर प्रदर्शित
  2. Bigg Boss OTT Season 2 : सलमान खान होस्ट करणार बिग बॉस ओटीटी सीझन 2
  3. Nawazuddin Siddiqui wife Aaliya : नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाला चाहत्याने दिला आडनाव बदलण्याचा सल्ला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.