ETV Bharat / entertainment

Mrunal Thakurs first look : नानी ३० मधील मृणाल ठाकूरच्या फर्स्ट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ

author img

By

Published : Jul 3, 2023, 7:37 PM IST

Updated : Jul 3, 2023, 7:52 PM IST

मृणाल ठाकूरचा आगामी नानीसोबतच्या चित्रपटातील फर्स्ट लूक आता समोर आला आहे. यात ती समुद्रकिनाऱ्यावर साडी नेसून अनवाणी चालत असताना मृणाल खूप सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakurs first look
मृणाल ठाकूरच्या फर्स्ट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ

मुंबई - अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनेता नानीसोबत काम करत असलेल्या आगामी चित्रपटाती फर्स्ट लूकने इंटरनेटवर जाळ केला आहे. प्रतिभावान अभिनेता आणि साऊथ सुपरस्टार नानी यांने आपली आगामी चित्रपट नानी ३० घोषित केल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

नानी 30 मधील पहिल्या लूकमध्ये, निळ्या रंगाच्या साडीत आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये मृणाल समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना अतिशय सुंदर दिसत आहे. चेहऱ्यावर हसू घेऊन ती अनवाणी फिरताना दिसते. समुद्रकिनाऱ्याची शांत पार्श्वभूमी आणि मृणालची शळालीनता यामुळे फोटोसाठी एक आकर्षक फ्रेम बनली आहे.

Mrunal Thakurs first look
मृणाल ठाकूरच्या फर्स्ट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ

दरम्यान, रविवारी सोशल मीडियावर नानीने इन्स्टाग्रामवर गायींमध्ये गवतावर बसलेले स्वतःचा फोटो पोस्ट केला. फोटो शेअर करताना, त्याने फक्त एक गाय आणि क्लाउड इमोजीसह कॅप्शनमध्ये जुलै, असे लिहिले. हा फोटो त्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे दिसते.

Mrunal Thakurs first look
मृणाल ठाकूरच्या फर्स्ट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ

नानी 30 हा मृणालचा सीता राममच्या यशानंतरचा दुसरा तेलुगु चित्रपट आहे. सीता रामममध्ये ती दुल्कर सलमानसोबत झळकली होती. तिने विजय देवराकोंडासोबत तिसऱ्या तेलगू प्रोजेक्टसाठीही साइन अप केले आहे. परशुराम पेटला दिग्दर्शित आणि श्री वेंकटेश्वर क्रिएशन्स निर्मित, या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

या वर्षीच्या जानेवारीमध्ये हैदराबादमध्ये एका भव्य मुहूर्ताच्या पूजेसह नानी ३० चे शूट सुरू झाले. या चित्रपटात मृणालच्या लस्ट स्टोरीज २ सहकलाकार अंगद बेदी देखील आहे. नानी ३० चे दिग्दर्शन शौर्यव यांनी केले आहे आणि मोहन चेरुकुरी, डॉ विजेंदर रेड्डी टीगाला आणि मूर्ती के एस हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

दरम्यान मृणाल ठाकूरने जूनच्या पहिल्या आठवड्यात विजय देवराकोंडासोबतच्या चित्रपटाला हैदराबादमध्ये सुरूवात केली. परशुराम पेटला दिग्दर्शित या चित्रपटाचे शीर्षक व्हीडी १३ असे तात्पुरते ठेवण्यात आलंय. विजय देवराकोंडासोबत मृणालची जोडी झळकणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरलाय. आगामी चित्रपटात विजय देवराकोंडा दुसऱ्यांदा परशुराम पेटलासोबत एकत्र येणार आहे. या दोघांनी यापूर्वी २०२८ मध्ये गीता गोविंदम चित्रपट दिला होता. यात विजयची रश्मिका मंदान्नासोबत जोडी होती.

हेही वाचा -

१. Yodha Release Postponed : डिसेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर होणार तुंबळ युद्ध, योद्धाचे रिलीज लांबणीवर

२. Satyaprem Ki Katha : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल कार्तिकने प्रेक्षकांचे मानले आभार

३. Thalapathy Vijay : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपथी विजय उतरणार राजकारणात?

Last Updated : Jul 3, 2023, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.