ETV Bharat / entertainment

Thalapathy Vijay : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपथी विजय उतरणार राजकारणात?

author img

By

Published : Jul 3, 2023, 5:28 PM IST

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपथी विजय 30 वर्षांपेक्षा जास्त फिल्मी करिअरनंतर चित्रपट सोडणार आहेत. चला जाणून घेऊया याच्या मागचे कारण काय आहे?

Thalapathy Vijay
थलपथी विजय

मुंबई : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजयच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विजय हा चित्रपटसृष्टी सोडत आहे. अरे थांब... सुपरस्टार विजय चित्रपटांपासून कायमचा दूर होत नाही, तर काही वर्षांसाठी तो चित्रपटांपासून दूर जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय आपले प्रोजेक्ट्स पूर्ण केल्यानंतर 2 ते 3 वर्षांसाठी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेत आहेत. रिपोर्ट्सनुसार विजय हा राजकारणात उतरणार आहे आणि त्यामुळे तो तामिळ चित्रपटसृष्टीपासून दुरावणार आहे. विशेष म्हणजे 2026 मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विजयच्या पक्षाचे नाव थलपथी विजय मक्कल इय्यकम असे आहे.

तरुणांना पुढे नेण्यासाठी विजय राजकारणात उतरणार : दरम्यान, आता ही बातमी ऐकून विजयच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ही बातमी तो सोशल मीडियावर झपाट्याने पसरवत आहे. सध्या विजय वेंकट प्रभू यांच्या लिओ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, विजयला राजकारणात रस आहे आणि या बातमीमुळे काही त्याचे चाहतेही खूश आहेत. दरम्यान तरुणांना पुढे नेण्यासाठी विजयने 'थलपती विजय मक्कल इय्यकम' ही संस्था सुरू केली आहे. त्याचबरोबर त्याने या पक्षाकडून स्थानिक निवडणूकही लढवली आहे.

निवेदनात काय म्हटले : विजयने 'थलपती विजय मक्कल इय्यकम' द्वारा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'विजय यांच्या सूचनेनुसार, थलपथी विजय मक्कल इयक्कम शहरी स्थानिक निवडणुकामध्ये कोणतीही युती न करता किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता निवडणुका लढतील. चाहत्यांना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, लोकांना आमच्या कामाबद्दल सांगावे आणि त्यांच्या विजयाची तयारी करावी. मात्र अद्याप या बातमीबाबत विजयकडून पुष्टी करण्यात आलेली नाही आहे, त्यामुळे खरच विजय हा चित्रपसृष्टीतून काही काळ ब्रेक घेणार का ? याबाबत लवकरच माहित होणार, तसेच 2024मध्ये विजयचा लिओ हा चित्रपट रूपेरी पडद्यावर येणार आहे. लिओ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार हे येणाऱ्या काळात समजेल.

हेही वाचा :

  1. Malavika Mohanan pictures : मालविका मोहननने मदुराईमधील थंगालनच्या सेटवरून शेअर केले विहंगम फोटो
  2. SPKK box office collection day 4: 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालत आहे धुमाकुळ...
  3. ZHZB collection day 30 : 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कमाईच्याबाबतीत मागे पडला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.