ETV Bharat / entertainment

Jawan pre release event: चेन्नई विमानतळावर 'किंग खान'चे जल्लोषात स्वागत, 'जवान' प्री रिलीज इव्हेन्टसाठी भव्य मंच सज्ज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 4:54 PM IST

Updated : Aug 30, 2023, 6:19 PM IST

'जवान' चित्रपटाच्या प्री रिलीज इव्हेन्टसाठी चेन्नई नगरी सज्ज झाली आहे. वैष्णौदेवी मातेच्या दर्शनानंतर शाहरुखचे इथे आगमन झाले असून विमानतळावर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. चाहत्यांच्या अलोट गर्दीत शाहरुख खान जेव्हा स्जेवर येईल त्यावेळचा माहोल पाहण्यासारखा असेल.

Jawan pre release event
http://10.10.50.80:6060//finalout3/odisha-nle/thumbnail/30-August-2023/19392432_600_19392432_1693390542424.png

हैदराबाद - सुपरस्टार शाहरुख खान 'जवान' चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमासाठी चेन्नई शहरात दाखल झाला आहे. या इव्हेन्टपूर्वी त्याने जम्मू काश्मीरमध्ये जाऊन वैष्णौदेवी मातेचे दर्शन घेतले होते. त्यानंतर तो तातडीने तामिळनाडूला परतला. चेन्नई विमानतळावर शाहरुखचे दर्शन होताच चाहत्यांनी जोरदार जल्लोष करत त्याचे स्वागत केले.

'जवान' प्री रिलीज इव्हेन्टसाठी भव्य मंच सज्ज

आधी माहिती दिल्याप्रमाणे, शाहरुख खान आज संध्याकाळी चेन्नईमध्ये होणाऱ्या 'जवान' चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेन्टमध्ये सहभागी होणार आहे. श्री साईराम इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसारत पार पडणाऱ्या या भव्य सोहळ्यात जवान चित्रपटाचा प्रमोशनल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केवळ निमंत्रितांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाल उपस्थित शाहरुखचे चाहते त्याला पाहण्यासाठी खूप आतुर झाले आहेत.

शाहरुख चेन्नई शहरात पोहोचल्यानंतर अनेक व्हिडिओ चाहत्यांनी व्हायरल केले आहेत. या कार्यक्रमात शाहरुख जवान चित्रपटाच्या टीमसह सहभागी होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारसह अभिनेत्री नयनतारा, साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती आणि इतर कलाकारही सहभागी होणार आहेत.

जवानचा प्री रिलीज कार्यक्रम हा म्यूझिकल असणार आहे. या चित्रपटाची तीन गाणी आतापर्यंत रिलीज झाली आहेत. विशेष म्हणजे हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज झालेल्या या गाण्यावर शाहरुख स्टेजवर थिरकण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्रीतील बीड जिल्ह्यातून शाहरुखचे चाहते चेन्नईतील या कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत. जवान चित्रपटाचा हा प्री रिलीज सोहळा सन नेटवर्क या वाहिनीवर थेट प्रसारित केला जाणार आहे.

जवान चित्रपटाचा आज रंगणारा प्री रिलीज सोहळा अनेक अर्थाने लक्ष वेधणारा आहे. अद्याप या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला नाही. यामधील तीन गाणी आतापर्यंत रिलीज केली गेली आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांना आजचा दिवस यादृष्टीने खूप महत्त्वाचा वाटतो. या चित्रपटाचा ट्रेलर रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज होऊ शकतो असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय दोन दिवसापूर्वी हा ट्रेलर ३१ ऑगस्ट रोजी रिलीज होऊ शकतो असा अंदाज केला जात होता. यापार्श्वभूमीवर प्री रिलीज कार्यक्रम पार पडत असल्यामुळे ट्रेलर रिलीज होईल का याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -

१. Shreya Ghoshal in Indian Idol : इंडियन आयडॉलमध्ये 'स्पर्धक ते परीक्षक' प्रवास झाल्याने श्रेया घोषाल स्वतःला मानते धन्य

२. Mamata Banerjee in Mumbai : ममता बॅनर्जी रक्षाबंधनासाठी 'जलसा'वर जाणार, अमिताभ बच्चन यांनी दिलं निमंत्रण

३. Allu Arjun : Allu Arjun : अल्लू अर्जुनने शेअर केला 'पुष्पा 2'च्या सेटवरील रोमांचक अनुभव

Last Updated : Aug 30, 2023, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.