ETV Bharat / entertainment

Allu Arjun : Allu Arjun : अल्लू अर्जुनने शेअर केला 'पुष्पा 2'च्या सेटवरील रोमांचक अनुभव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 1:57 PM IST

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'मधील फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासूनच चाहते त्याच्या चित्रपटाची वाट उत्सुकतेने पाहत आहे. दरम्यान आता या चित्रपटासंदर्भात अपडेट समोर येत आहे.

Allu Arjun
अल्लू अर्जुन

मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या 'पुष्पा 2'मुळे चर्चेत आहे. पुष्पा 2' मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक जेव्हापासून प्रदर्शित झाला तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान आता 'पुष्पा 2' या चित्रपटाची डेट लॉक करण्यात आली आहे. पुष्पा 2' हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या बहुप्रतिक्षित क्राईम ड्रामा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सध्या अल्लू अर्जुनने शूटिंग प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंतच्या अनेक झलक दाखविण्यात आल्या आहेत.

असा होता अल्लू अर्जुनच्या शुटिंगचा प्रवास : अल्लू अर्जुनला कव्हर करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामची एक टीम त्याच्या घरी पोहोचली होती. अल्लूचा प्रवास शुटिंग दरम्यान कसा होता, हे या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे. अल्लूच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 650 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. व्हिडिओमध्ये तो जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी 'रामोजी फिल्म सिटी'मध्ये प्रवेश करतो. त्यानंतर तो त्यांच्या चाहत्यांना भेटतो आणि नंतर सेटवर जातो. तसेच यावेळी तिथे दिग्दर्शक सुकुमार देखील शूटिंग सेटवर पोहचतात. त्यानंतर अल्लू हा चित्रपटामधील गेटअपमध्ये तयार होतो आणि शुटिंगसाठी जातो. यानंतर अल्लू हा चित्रपटामधील अनुभव शेअर करत सांगतो, की हा चित्रपट त्याच्यासाठी खूप खास आहे. याशिवाय तो दिग्दर्शक सुकुमारसोबत केलेल्या मागील चित्रपटांच्या अनुभवबद्दल सांगतो.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले : निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला चित्रपटाचा पहिला व्हिडिओ आणि फर्स्ट लूक रिलीज केला होता. अल्लूचा हा लूक पाहून त्याच्या चाहत्यांना एक धक्का बसला होता, कारण या लूकमध्ये तो खूप वेगळा दिसत होता. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो पूर्ण निळ्या अवतारात दिसला. या पोस्टरमध्ये अल्लूच्या ,गळ्यात हार असून त्याने कानात झुमके घातले होत. याशिवाय त्याने साडी देखील नेसली होती. या चित्रपटाचे टीझर आणि ट्रेलर सादर करण्याची तयारी सुरू आहे. तसेच नुकतेच अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अल्लूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा :

  1. Sunny deol And Dimple kapadia : सनी देओल अमृता सिंगसोबत डिंपल कपाडियाच्या घराबाहेर दिसल्याने चर्चेला उधाण
  2. Salaar vs Jawan: अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'सालार' देत आहे 'जवान'ला टक्कर...
  3. Ajay Devgan : अजय देवगण 'दे दे प्यार दे'चा सीक्वलसाठी झाला सज्ज...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.