ETV Bharat / entertainment

कोर्ट मॅरेजनंतर आयरा खान आणि नुपूर शिखरे होणार राजस्थानला रवाना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 2:55 PM IST

Ira Khan and Nupur Shikhare Wedding : आमिर खानची मुलगी आयरा खान 3 जानेवारीला म्हणजे आजच लग्नबंधनात अडकणार आहे. आता काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात लग्नाआधीची तयारी दिसत आहे.

Ira Khan and Nupur Shikhare Wedding
आयरा खान आणि नुपूर शिखरेचं लग्न

मुंबई Ira Khan and Nupur Shikhare Wedding : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आज 3 जानेवारीला लग्न करणार आहे. आमिर खानचं घर पूर्णपणे सजलं आहे. आयरा आणि नुपूर शिखरेचे प्री-वेडिंग फंक्शन्स 2 जानेवारीपासून सुरू झाले आणि आज या जोडप्याचं कोर्ट मॅरेज होणार आहे. त्यानंतर हे जोडपे 8 जानेवारीला राजस्थानमधील उदयपूरमध्ये महाराष्ट्रीय रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याच्या लग्नाचे विधी सध्या सुरू आहेत. काल आमिर खानच्या लाडक्या मुलीचा हळदीचा समारंभ पार पडला. आज आयराच्या हातावर मेहंदी लावली जाणार आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरेचं लग्न शाही थाटात होणार असल्याचं समजत आहे.

आयरा खान आणि नुपूर शिखरेचं लग्न : आमिर खानची बहीण निखत खान हेगडेनं लग्नसोहळ्यासंदर्भात काही माहिती शेअर केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निकतनं सांगितलं की, आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या संगीत समारंभासाठी कुटुंबानं एकत्र नृत्याचा सराव केला आहे. याशिवाय आयराची आई रीना दत्ताचे कुटुंब दिल्ली आणि पंजाबमधून मुंबईला आले आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे आज मुंबईतील ताज लँड्स एंड येथे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी 2 ते 4 या वेळेत लग्नाची नोंदणी करणार आहे. यानंतर ताज लँड्स एंड येथे भव्य रिसेप्शन होईल, ज्यात फक्त मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

राजस्थानमध्ये घेणार सात फेरे : यानंतर आमिरची मुलगी आणि जावई उदयपूरला रवाना होतील, जिथे त्यांचे भव्य लग्न होणार आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये नूपूर आणि आयरा खानच्या लग्नानंतर आमिर खान 13 जानेवारीला मुंबईत बॉलिवूड स्टार्सना ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहे. या पार्टीत शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत सर्व बडे स्टार्स उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून प्री-वेडिंग फंक्शन्स साजरे करण्यात व्यग्र आहे. काल संध्याकाळी आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव दिसले होते.

हेही वाचा :

  1. बॉबी देओलनं मुलगा आर्यमन देओलसोबतचे शेअर केले फोटो
  2. अरबाज खानचा मुलगा अरहान खान रवीना टंडनची मुलगी राशा थडानीसोबत झाला स्पॉट
  3. आयरा खान-नुपूर शिखरेचा आज महाराष्ट्रीयन पद्धतीन होणार विवाह, नुपूर रोमँटिक पोस्ट केली शेअर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.