ETV Bharat / entertainment

अरबाज खानचा मुलगा अरहान खान रवीना टंडनची मुलगी राशा थडानीसोबत झाला स्पॉट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 12:07 PM IST

Arhaan Khan-Rasha Thadani
अरहान खान-राशा थडानी

Arhaan Khan-Rasha Thadani: अलीकडेच अरबाज खानचा मुलगा अरहान हा रवीना टंडनची मुलगी राशासोबत स्पॉट झाला होता. दोघांना एकत्र पाहून आता अनेकजण त्यांच्या नात्याविषयी अंदाज लावताना दिसत आहेत.

मुंबई - Arhaan Khan-Rasha Thadani: अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान चर्चेत आला आहे. आता अलीकडेच अरबाज खानचं दुसर लग्न झालं. या लग्नामधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अरहान हा रवीना टंडनची मुलगी राशा थडानीसोबत 2 जानेवारी रोजी मुंबईत फिरताना दिसला होता. पापाराझीला अरहान खान आणि राशा थडानीनं पाहिल्यानंतर दोघेही तिथून घाईत निघताना दिसले. व्हिडिओमध्ये अरहाननं पांढऱ्या टी-शर्ट आणि ट्राउझर्स घातला होता. या लूकमध्ये तो देखणा दिसत होता.

अरहान खान आणि राशा थडानीचा व्हिडिओ व्हायरल : दुसरीकडे राशानं डेनिम ब्लू जीन्ससह ब्लॅक ऑफ शोल्डर टॉप परिधान केलं होता. यावर तिनं केसं मोकळे सोडली होते. या लूकमध्ये ती सुंदर दिसत होती. अरहान आणि राशा कारकडे वेगानं जात असताना त्यांनी पापाराझींकडे दुर्लक्ष केले. जरी दोघांनामध्ये मैत्री असली, तरीही आता अनेकजण त्याच्या नात्याबद्दल अंदाज लाऊ लागले आहेत. अभिनेत्री रवीना टंडननं अरबाज खानच्या लग्नात मुलगी राशासोबत हजेरी लावली होती. अरबाजच्या लग्नामधील एका फोटोमध्ये अरहान आणि राशा एकत्र दिसत आहेत.

अरहाननं वाजवली गिटार : याशिवाय अरबाजच्या लग्नातील एका व्हिडिओमध्ये अरहान हा इलेक्ट्रिक गिटार वाजवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अरबाज त्याच्या मुलाची प्रतिभा रेकॉर्ड करत आहे. दरम्यान, राशा थडानी अभिषेक कपूर दिग्दर्शित अनटाइटल्ड असलेल्या चित्रपटामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या प्रोजेक्टमध्ये अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणही पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपट फेब्रुवारी 2024 मध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान अरबाजचा मुलगा अरहान हा परदेशात शिकत आहे. त्यानं गेल्या वर्षीच्या सुरुवातीला मलायकाच्या वेब शो 'मूव्ह इन विथ मलायका'मध्ये काम केलं होतं. अरहान अनेकदा आई मलायकासोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतो. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटानंतर अरहान हा मलायकाबरोबर राहात आहे.

हेही वाचा :

  1. आयरा खान नुपूर शिखरेचा आज महाराष्ट्रीयन पद्धतीन होणार विवाह, नुपूर रोमँटिक पोस्ट केली शेअर
  2. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर
  3. प्रेरणादायी कथेवर आधारित 'ओली की सुकी' चित्रपट, लवकरच होणार प्रदर्शित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.