ETV Bharat / entertainment

Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसाला 'डंकी'चा टीझर होईल प्रदर्शित....

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 12:37 PM IST

Dunki Teaser : शाहरुख खान स्टारर 'डंकी'च्या टीझरबाबत आता एक घोषणा झाली आहे. या चित्रपटाचा टीझर हा किंग खानच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Dunki Teaser
डंकी टीझर

मुंबई - Dunki Teaser: शाहरुख खानच्या 'जवान'नं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता किंग खान त्याच्या 'डंकी' चित्रपटातून पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचा या वर्षासाठीतील तिसरा चित्रपट 'डंकी' जाहीर केल्यापासून चाहते या चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. दरम्यान आता या चित्रपटाच्या टीझर रिलीजबाबत माहिती समोर आली आहे. याआधी किंग खानच्या 'पठाण' आणि 'जवान'नं रुपेरी पडद्यावर वादळ निर्माण केलं होतं, त्यामुळे 'डंकी' चित्रपटाबद्दल देखील चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.

'डंकी'चा टीझर : रिपोर्ट्सनुसार, 'डंकी'चा टीझर 2 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. एवढंच नाही तर शाहरुख खान मुंबईत त्याच्या चाहत्यांसाठी वाढदिवसाचा एक कार्यक्रम देखील आयोजित करणार आहे. या खास दिवशी तो त्याच्या चाहत्यांसह टीझर पाहणार आहे. हा सर्वांसाठी खास चित्रपट आहे, त्यामुळे या 'डंकी'ची प्रमोशनल कॅम्पेनही खास असणार आहे. 'डंकी'मध्ये शाहरुखचा एक वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीझरचे दोन व्हर्जन तयार करण्यात आले आहे. मात्र, कोणती आवृत्ती फायनल झाली आहे, हे स्पष्ट झालेले नाही. टीझरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून 'यू' प्रमाणपत्र मिळालं आहे. 'डंकी'ची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट, राजकुमार हिरानी फिल्म्स आणि जिओ स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री तापसी पन्नूही मुख्य भूमिकेत आहे.

'डंकी'चा पहिला रिव्ह्यू : 2023 हे वर्ष शाहरुख खानच्या नावावर आहे. किंग खाननं प्रदीर्घ काळानंतर 'पठाण'द्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. वर्षाच्या सुरुवातीला शाहरुखचा 'पठाण' प्रदर्शित होऊन हिट झाला. त्यानंतर त्याचा 'जवान' चित्रपट रिलीज झाला, या चित्रपटानं अनेक विक्रम मोडले. 'डंकी' हा 22 डिसेंबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'डंकी'चा पहिला रिव्ह्यू निघाला आहे. हा रिव्ह्यू अभिनेता बोमन इराणीनं दिला आहे. या चित्रपटात विकी कौशलचाही कॅमिओ असणार आहे.

हेही वाचा :

  1. Urfi Javed Receives Death Threat : उर्फी जावेदला जीवे मारण्याची मिळाली धमकी ; शेअर केली पोस्ट
  2. Kennedy received a standing ovation : 'मामी'मध्ये सनी लिओनीच्या 'केनेडी'ला मिळाले स्टँडिंग ओव्हेशन!
  3. Kennedy Received A Standing Ovation : 'मामी'मध्ये सनी लिओनीच्या 'केनेडी'ला मिळाले स्टँडिंग ओव्हेशन!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.