ETV Bharat / entertainment

Kennedy received a standing ovation : 'मामी'मध्ये सनी लिओनीच्या 'केनेडी'ला मिळाले स्टँडिंग ओव्हेशन!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 5:53 PM IST

Kennedy received a standing ovation : सनी लिओनीची मुख्या भूमिका असलेल्या अनुराग कश्यप दिग्दर्शित 'केनेडी' चित्रपटाचा प्रीमियर मामी फिल्म फेस्टीव्हल 2023 मध्ये पार पडला आणि चित्रपटाच्या शेवटी उपस्थितांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले. या प्रतिसादाने केनेडीची टीम भारावून गेली असून ते या चित्रपट प्रदर्शनासाठी प्रोत्साहित झाले आहेत.

Kennedy received a standing ovation
केनेडी'ला मिळाले स्टँडिंग ओव्हेशन

मुंबई - Kennedy received a standing ovation : अनुराग कश्यप दिग्दर्शित 'केनेडी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये भाग घेत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात सनी लिओनीनं तिच्या कारकिर्दीतील उत्तम अभिनय सादर केला असून तिला सर्वस्तरीय प्रशंसा मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर मामी फिल्म फोेस्टिव्हलमध्ये झाला आणि चित्रपटाच्या शेवटी उपस्थितांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले. या प्रतिसादाने केनेडीची टीम भारावून गेली असून ते या चित्रपट प्रदर्शनासाठी प्रोत्साहित झाले आहेत. 'मामी'मधल्या समीक्षकांना मोहित करणाऱ्या या खास स्क्रिनिंग ला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आणि प्रथितयश व्यक्तींनी आवर्जून हजेरी लावली होती.

Kennedy received a standing ovation
'मामी'मध्ये सनी लिओनीच्या 'केनेडी'ला मिळाले स्टँडिंग ओव्हेशन!


यावर्षीच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये केनेडी चा मिडनाईट प्रीमियर झाला होता. तेव्हाही केनेडी ने जगभरातील असंख्य चित्रपट रसिकांकडून वाहवाही मिळविली होती. या फेस्टिल्हलमध्येही केनेडी चित्रपटाला प्रेक्षकांनी स्टँडिंग ओव्हेशन दिली होती. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रेमामुळे दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि सनी लिओनीही भारवून गेली होती. या चित्रपटामुळे तिला पहिल्यांदाच तिच्या बेबी डॉल प्रतिमेहून वेगळी ओळख मिळाली. यापूर्वी तिनं अनेक हिंदी आणि इतर चित्रपटात काम केली पण तिची मूळ ओळख पुसून टाकण्यात तिला खऱ्या अर्थानं यश या केनेडी चित्रपटामुळेचं मिळालं आहे. यातील सनी लिओनी ची चार्ली भूमिका सर्वांना भावताना दिसतेय. सनी लियोनीचा भूतकाळ अजूनही प्रेक्षकांच्या मनःपटलावरून पुसला गेलेला नाहीये त्यामुळे तिच्यासाठी हा चित्रपट गेम-चेंजर ठरू शकतो. सनी लिओनी ही एक उद्योजिका असून प्रसिद्ध फॅशन आयकॉन सुद्धा आहे. ती विविध भाषांमध्ये काम करताना दिसत असून तिचे बॉईज या मराठी चित्रपटातील आयटम सॉंग 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला' बरेच गाजले होते.

Kennedy received a standing ovation
'मामी'मध्ये सनी लिओनीच्या 'केनेडी'ला मिळाले स्टँडिंग ओव्हेशन!



आपल्यातील अष्टपैलुत्व दर्शविण्यासाठी सनी लिओनी आव्हानात्मक भूमिकांना सामोरी जात असून ती आता ‘कोटेशन गँग’ मधून तमिळ मध्ये डेब्यू करीत आहे ज्यात जॅकी श्रॉफ, प्रियमणी आणि सारा अर्जुन यांच्यासोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे.

Kennedy received a standing ovation
'मामी'मध्ये सनी लिओनीच्या 'केनेडी'ला मिळाले स्टँडिंग ओव्हेशन!

हेही वाचा -

1. Ott Play Awards 2023: ओटीटी प्ले अवॉर्ड्सची झाली घोषणा; 'या' कलाकारांनी जिंकल सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार...

2. Raj Kundra Ut 69 : दिल्लीच्या चांदणी चौकात राज कुंद्रानं केलं अनोख्या 'छंदा'चं प्रदर्शन

3. Mami Film Festival 2023 : मामी फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रियांका चोप्रानं भूमी पेडणेकरवर उधळली स्तुती सुमनं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.