ETV Bharat / entertainment

prequel to The Ghazi Attack : पुन्हा एकदा पाहायला मिळणार द गाझी अटॅकचा थरार, 'आयबी ७१' प्रीक्वेलची घोषणा

author img

By

Published : May 5, 2023, 12:03 PM IST

prequel to The Ghazi Attack
द गाझी अटॅकचा थरार

द गाझी अटॅक या गाजलेल्या चित्रपटाचा प्रीक्वेल मोठ्या पडद्यावर पुन्हा सादर होणार असल्याची माहिती दिग्दर्शक संकल्प रेड्डी यांनी सांगितली. या चित्रपटाची संकल्पना विद्युत जामवाल याची असून तोच या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही करणार आहे.

मुंबई - द गाझी अटॅक हा १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यानची पार्श्वभूमी असलेला चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झाला होता. भारतीय युद्ध नौकेवरचा थरारक युद्धपट पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात सादर झाला. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. बॉक्स ऑफिसवरही सिनेमाने तगडी कमाई केली होती. या चित्रपटाचा प्रिक्वेल आणणार असल्याची घोषणा द गाझी अटॅक चित्रपटाचे दिग्दर्शक संकल्प रेड्डी यांनी केली आहे. नवीन निर्माण होणाऱ्या 'आयबी ७१' या चित्रपटाची संकल्पना अभिनेता विद्युत जामवाल यांनी संकल्प रेड्डी यांना सुचवली होती आणि विद्युत या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

नव्या कथानकाचे संशोधन - या नव्या चित्रपटाबद्दल बोलताना संकल्प रेड्डी यांनी सांगितले की, 'जेव्हा विद्युतने मला गंगा अपहरणाच्या घटनेबद्दल सांगितले, तेव्हा मला वाटले की ही एक विलक्षण कथा आहे, परंतु आम्ही संशोधनात या विषयाच्या खोलवर गेलो, तेव्हा आम्हाला जाणवलं की ते गाझी हल्ल्याच्या आध्यात्मिक प्रीक्वलसारखे काहीतरी अतिशय वेगळे आहे.'

द गाझी अटॅकचा प्रीक्वेल - संकल्प रेड्डी पुढे म्हणाले, 'द गाझी अटॅक आणि त्याचा आता बनणारा प्रिक्वेल 'आयबी ७१' हे दोन्ही चित्रपट 1970 च्या दशकातील आहेत आणि भारताच्या लष्करी इतिहासाची पार्श्वभूमी असलेले आहेत. त्यामुळे विद्युत जामवालने सिनेमॅटिक विश्व निर्माण करण्याची संधी या विषयात पाहिली. एक जग निर्माण करण्याची आणि प्रेक्षकांना एका प्रवासात घेऊन जाण्याची ही एक उत्तम संधी असल्याचे ठरले.' 'आयबी ७१' साठी केलेल्या संशोधनाविषयी बोलताना रेड्डी म्हणाले, मी जेव्हा या चित्रपटासाठी संशोधन सुरू केले तेव्हा मला जाणवले की 1971 च्या गंगा अपहरणाबद्दल फारशा लोकांना माहिती नव्हती. इतिहासातील तथ्ये एकत्रित करणे आणि ते आकर्षक पद्धतीने मांडणे हे एक आव्हान होते. पण एक चित्रपट निर्माता म्हणून, मला ही कथा जगासमोर दाखवायची होती आणि मला आनंद आहे की टीमने ती पडद्यावर जिवंत करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत.

द गाझी अटॅक हा चित्रपट ज्याने 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान पाकिस्तानी पाणबुडी गाझी या भव्य पाणबुडीला जलसमाधी दिलेल्या आयएनएस करंजची कथा होती. चित्रपटाची सत्यता, तांत्रिक बारकावे आणि आकर्षक कथानकासाठी या चित्रपटाचे कौतुक झाले होते.

हेही वाचा - The Night Manager Part 2 : अनिल कपूर स्टारर ओटीटी मालिका द नाईट मॅनेजर पार्ट 2 ची रिलीज डेट ठरली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.