ETV Bharat / state

मुंबईनंतर पिंपरी चिंचवडमध्ये कोसळले लोखंडी होर्डिंग...; वाहनांचं झालं नुकसान, पाहा व्हिडिओ - Pune Hoarding Collapse

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 10:41 PM IST

Pune Hoarding Collapse : मुंबईच्या घाटकोपरची होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असताना, पुण्यातील पिंपरी चिंडवडमध्ये मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना (Hoarding Collapse In Moshi) उघडकीस आलीय. या घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

Pune Hoarding Collapse
लोखंडी होल्डींग कोसळले (Pune Reporter)

पिंपरी चिंचवडमध्ये कोसळले लोखंडी होर्डिंग (Pune Reporter)

पिंपरी चिंचवड Pune Hoarding Collapse : मुंबईतील घाटकोपर येथे लोखंडी होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला. आता पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी भागात लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना (Hoarding Collapse In Moshi) घडलीय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर 4 दुचाकी आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेमुळं मोठी दुर्घटना टळली आहे.

लोखंडी होर्डिंग अचानक कोसळले : याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड शहराती काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. मोशी येथे रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी होर्डिंग अचानक कोसळले. मात्र, हे होर्डिंग 4 दुचाकी आणि एका चारचाकी गाडीवर कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्य रस्त्यावर हे होर्डिंग कोसळले नाही. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता हे कोसळलेले होर्डिंग अधिकृत की, अनधिकृत याबाबत माहिती समोर आलेली नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यानंतर ही दुर्घटना घडली. त्यामुळं या गाड्यांचं झालेलं नुकसान कोण भरून देणार? हा खरा प्रश्न आहे.



पिंपरी चिंचवड शहरात अनेक अनधिकृत होर्डिंग : पिंपरी चिंचवड शहरात मागच्यावर्षी वादळी वाऱ्यानं होर्डिंग कोसळलं होतं. यात सात ते आठ महिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाला जाग आली होती. मात्र, काही दिवसातच तो प्रश्न पुन्हा धूळखात पडला. मात्र, आजच्या घटनेनं अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासन हा अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न मार्गी लावणार का? की लोकांचे जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. मुंबईत वादळी वाऱ्यामुळं दोन दुर्घटना; पेट्रोलपंपावर होर्डिंग्स कोसळल्यानं अनेक वाहनं दबली तर सुमारे 35 जण जखमी - Heavy Rain in Mumabi
  2. पेट्रोल पंप असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा, आणखी काहीजण होर्डिंगखाली अडकल्याची भीती - Ghatkopar Hording Collapsed
  3. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : पोलीस कल्याण निधीच्या वादात निष्पापांचे बळी ? किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप - Ghatkopar Hoarding Collapse
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.