ETV Bharat / politics

मनमाडने भारती पवार यांना लीड द्यावा... विकास करण्याचं वचन मी देतो; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 10:37 PM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे आणि भारती पवार यांचा उल्लेख केला. तसंच आमदार सुहास कांदे यांच्या कामाचं कौतुक केलं.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (Nashik Reporter)

नाशिक Lok Sabha Election 2024 : मागीलवेळी मनमाडनं भारती पवार (Bharati Pawar) यांना लीड दिला होता. यंदाही मनमाड, नांदगावणेत त्यांना लीड द्यावा, त्यानंतर केंद्रातून आणि राज्यातून विकास करण्याचं वचन मी देतो असं स्पष्ट मत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमाड येथे जाहीर सभेत व्यक्त केलं. महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पंकजा मुंडे, आमदार सुहास कांदे, डॉ. भारती पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

दुष्काळ इतिहासजमा होणार : यावेळी फडणवीस यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या कामाचं कौतुक केलं. माझा आणि त्यांचा जुना परिचय आहे. जन सामान्यांनाची कामं करणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आहे. तुमच्यासाठी काम करणारा आमदार आहे. त्यांनी मनमाडकरासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणी योजना आणली असून तिचं केवळ 10 टक्के काम बाकी आहे. ते होताच येथील दुष्काळ इतिहास जमा होईल आणि मनमाडकरांना रोज पाणी मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


भारती पवार यांना निवडून द्या : मोठ्या शहरात नसेल असं स्टेडियम तयार होत आहे. येथे उद्योग आणण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही भारती पवार यांना निवडून द्या, आम्ही तुमच्यासासाठी बेअरर चेक आहोत. निवडणूक होताच तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करून देईन असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले की, त्यांच्याकडून निधी आणून नाशिक, नगर, जिल्ह्यातील पाणी समस्या मार्गी लावण्याचं देखील प्रपोजल तयार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.


ही निवडणूक साधी नाही : एकीकडं कौरव तर दुसरीकडं पांडव आहे, हे युद्ध मताच्या रुपानं जिंकायचं आहे. दुसरीकडं राहुल गांधी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 24 पक्षाची खिचडी असल्याचं ते बोलले. तर खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता सकाळी 9 वाजता एक पोपटलाल येतो आणि बडबड करून जातो. त्यांना विचारलं तर आमच्याकडं अनेक उमेदवार असल्याचं ते म्हणतात. हे काय संगीत खुर्चीचा खेळ करून दरवर्षी एक पंतप्रधान करणार का? असा टोलाही त्यांनी लगावला. या देशाला सुरक्षित ठेवेल असा पंतप्रधान निवडायचा आहे. आमच्या गाडीत सर्व जाती धर्माच्या लोकांना बसण्यासाठी जागा आहे, तर दुसरीकडं फक्त इंजिन आहे. त्यांच्या इंजिनमध्ये गांधी, ठाकरे, पवार यांच्यासाठीच जागा आहे. 10 वर्षात मोदी यांनी चमत्कार केला. 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं, लोकांना पक्की घरं दिलीत, शौचालय दिलं. 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जात आहे. भविष्यात मोदी हे सोलर योजना आणणार आहेत. त्या माध्यमातून 300 युनिट मोफत मिळणार आहे. कांद्यासारखा प्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग काढू असंही फडणवीस म्हणाले.

मुस्लिमना भडकविण्याचं काम केलं : कांद्याचा, सोयाबीनचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची गरज आहे. फडणवीस नेहमी केंद्रात प्रयत्न करतात. विरोधकाच्या भुलथापाना बळी पडू नका, यांच्यातर्फे मुस्लिमांना भडकविण्याचं काम केलं जात आहे. 10 वर्षात किती दंगली झाल्या. मुस्लिमांना भीती दाखवून भाजपाच्या जवळ येऊ देत नाही, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही याची ग्वाही मी देते. विरोधक संविधान बदलण्याची भाषा करतात. मात्र, अशी भावना मोदी यांची नाही. संघर्ष कोणाच्या वाट्याला येत नाही, मुंडे साहेबांसोबत माझ्या वाट्याला देखील संघर्ष आला. पण मागे हटवायचं नाही. आता भारती पवार यांना खासदार करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

बहीण आणि मुलगी समजुन चूक पदरात : यावेळी सुहास कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या कामाची यादी वाचून दाखवली. तर भविष्यात काय-काय कामं करायची आहेत आणि यासाठी आपल्याला निधीची गरज आहे. यामुळं आम्हाला भरघोस निधी द्यावा अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली. भारती पवार यांनीही आपल्या भाषणात माझ्याकडून तुम्हाला वेळ देता आला नसेल मात्र, मी विकास कामं केली आहेत. त्यासाठी माझा वेळ गेला आहे. यामुळं काही ठिकाणी मला जाता आलं नसेल तर, तरी तुमची बहीण आणि मुलगी समजून पदरात घ्या, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. पाचव्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारात अजित पवार यांचा सहभाग नसल्यानं चर्चांना उधाण - Lok Sabha Election 2024
  2. राऊतांच्या 'त्या' आरोपानंतर हेलिकॉप्टमधून उतरताच निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी, मात्र... - lok sabha election
  3. मोदींच्या रोडशोमुळे मुंबईकर त्रस्त, मात्र मंत्री शंभूराज देसाई यांचं मौन - PM Modi Road Show
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.