ETV Bharat / entertainment

The Night Manager Part 2 : अनिल कपूर स्टारर ओटीटी मालिका द नाईट मॅनेजर पार्ट 2 ची रिलीज डेट ठरली

author img

By

Published : May 5, 2023, 10:55 AM IST

अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर अभिनीत द नाईट मॅनेजर या लोकप्रिय मालिकेचा भाग 2 डिस्ने+ हॉटस्टार वर 30 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. द नाईट मॅनेजरमध्ये शोभिता धुलिपाला, तिलोतमा शोम, रवी बहल आणि सास्वता चॅटर्जी यांचा समावेश असलेल्या कलाकारांचा समावेश आहे.

The Night Manager Part 2
द नाईट मॅनेजर पार्ट 2

मुंबई - जॉन ले कॅरे यांच्या द नाईट मॅनेजर या कादंबरीवर आधारित याच नावाची लोकप्रिय हिंदी वेब सिरीजचा दुसरा भाग ३० जून रोजी डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. द नाईट मॅनेजर हा एक हाय ड्रामा असलेली थ्रिलर मालिका आहे. भव्य आणि नेत्रदिपक लोकेशन्स, तगडी स्टार कास्ट आणि रोमांचक कथा असलेली द नाईट मॅनेजर मालिकेचा पहिला भाग मोठी उत्कंठा निर्माण करुन गेला होता.

अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचा पडद्यावर संघर्ष - या मालिकेत बॉलिवूड स्टार अनिल कपूर याने शस्त्रास्त्र व्यापार्‍याची भूमिका केली आहे आणि आदित्य रॉय कपूर याने आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र सिंडिकेटची माहिती काढण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या एजंटची मुख्य भूमिका साकारली आहे. या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांमध्ये अतिशय औत्सुक्य निर्माण करुन संपला होता. दुसऱ्या भागात मोठा जिकीरीचा संघर्ष आदित्य रॉय कपूर करताना दिसणार आहे.

रोमांचक मालिका द नाईट मॅनेजर - शोबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाला, 'आमच्या चाहत्यांनी द नाईट मॅनेजरसाठी दाखवलेले प्रेम आणि पाठिंबा पाहून मी भारावून गेलो आहे. त्यांच्या उत्साहाने आम्हाला अधिक मेहनत करण्यास प्रवृत्त केले आहे. प्रत्येकजण ट्विस्ट आणि टर्न पाहण्याची मी वाट पाहू शकत नाही. शेली (शोमधील माझी व्यक्तिरेखा) त्याच्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये दिसेल.' या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन संदीप मोदी आणि दुसरे दिग्दर्शक प्रियांका घोष यांनी केले आहे.

आदित्य रॉय कपूर समाधानी - 'पहिल्या भागाचे यश खरोखरच नम्र आहे, आणि शेली आणि शानच्या प्रवासात पुढे काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही प्रेक्षकांसाठी उत्सुक आहोत. ट्विस्ट, रोमांच आणि तणाव या सर्व गोष्टी एकमेकांना भिडतील,' असे आदित्य रॉय कपूर यांनी सांगितले. द इंक फॅक्टरी आणि बानीजय एशिया द्वारे निर्मित, द नाईट मॅनेजर भाग २ 30 जून रोजी Disney+ Hotstar वर प्रसारित होईल. द नाईट मॅनेजरमध्ये शोभिता धुलिपाला, तिलोतमा शोम, रवी बहल आणि सास्वता चॅटर्जी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा - south Actor Brahmanandam : दाक्षिणात्य अभिनेता ब्रह्मानंदम यांनी भाजप नेते के सुधाकर यांच्यासाठी केला प्रचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.