ETV Bharat / entertainment

Allu Arjun wish for David Warner : अल्लु अर्जुननं डेव्हिड वॉर्नरला दिल्या 'पुष्पा' स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 5:34 PM IST

Allu Arjun wish for David Warner : ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला अभिनेता अल्लु अर्जुननं शुभेच्छा दिलेत. दोघेही एकमेकांचे चाहते असून एकमेकांना शुभेच्छांची देवाण घेवाण करत असतात. अल्लुनं दिलेल्या शुभेच्छानंतर वॉर्नरनंही त्याला धन्यवाद दिलेत.

Allu Arjun wish for David Warner
डेव्हिड वॉर्नरला अल्लु अर्जुननं दिल्या शुभेच्छा

मुंबई - Allu Arjun wish for David Warner : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आज आपला वाढदिवस साजरा करतोय. त्याला 'पुष्पा' स्टार अल्लु अर्जुनकडून खास शुभेच्छा मिळाल्या आहेत. इन्स्टाग्रामवर अल्लु अर्जुननं डेव्हिड वॉर्नर पुष्पा स्टाईलनं पोज देत असलेला एक फोटो शेअर केला. आणि लिहिलं, 'क्रिकेट सुपरस्टार डेव्हिड वॉर्नरला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुला जे हवंय त्याहून तुला खूप अधिक मिळो.'

Allu Arjun wish for David Warner
अल्लु अर्जुननं डेव्हिड वॉर्नरला दिल्या 'पुष्पा' स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

सध्या भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा महात्त्वाचा खेळाडू आहे. वॉर्नरनं अनेकवेळा 'पुष्पा' चित्रपटाबद्दल आणि अल्लु अर्जुनवरील प्रेम व्यक्त केलंय. 'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली' गाण्यावर एक रीलही त्यानं बनवलं होतं जे व्हायरल झालं होतं.

दिल्लीत अलिकडे खेळल्या गेलेल्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातील वॉर्नरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात तो सीमारेषेवर उभा असताना 'पुष्पा' स्टाईलमध्ये प्रेक्षकांना प्रतिसाद देत होता. इतकंच नाही तर 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अल्लु अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर वॉर्नरनं त्याचं अभिनंदन केलं. वॉर्नरने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अल्लू अर्जुनचा फोटो पुन्हा शेअर केला आणि लिहिले, 'अभिनंदन आणि शुभेच्छा, अल्लू अर्जुन.'

'पुष्पा: द राइज'मध्ये गँगस्टरची भूमिका करणारा अल्लू आता 'पुष्पा: द रुल' या सिक्वेलमध्ये पुन्हा आक्रमक भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्रिविक्रम दिग्दर्शित हा बहुप्रतीक्षित चित्रपट मोठ्या मनोरंजनासाठी शूट होत आहे.

डेव्हिड वॉर्नरने गेल्या शुक्रवारी चालू असलेल्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 163 धावांची जबरदस्त फलंदाजी करुन संघाला विजय मिळवून दिला. वॉर्नरचे 163 हे 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्धचे सलग चौथे शतक होते जे एका संघाविरुद्धचे सर्वाधिक सलग एकदिवसीय शतक आहे.

2017 पासून डेव्हिड वॉर्नरचा पाकिस्तानविरुद्धची धावसंख्या 130, 179, 107 आणि 163 अशी आहे. त्याने 2017 ते 2018 या कालावधीत वेस्ट इंडिजविरुद्ध सलग चार शतके झळकावण्याचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. या फलंदाजीमुळे वॉर्नरची 7-0 पेक्षा अधिक धावसंख्या 130 पेक्षा अधिक आहे.

हेही वाचा -

  1. Tiger 3 advance booking : 'टायगर 3' च्या आगाऊ तिकीट विक्रीची तारीख जाहीर, चाहत्यांमध्ये उत्साह

2. MAMI Film Festival 2023 : देसी गर्ल प्रियांका चोप्राचं मामी फेस्टीव्हलसाठी आगमन

3. Rhea Chakraborty : सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं व्हिडिओ पोस्ट करून शेअर केला तुरुंगातील अनुभव...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.