ETV Bharat / entertainment

MAMI Film Festival 2023 : देसी गर्ल प्रियांका चोप्राचं मामी फेस्टीव्हलसाठी आगमन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 9:55 AM IST

MAMI Film Festival 2023 : आंतरराष्ट्रीय मुंबई फिल्म फेस्टीव्हल ( मामी ) 2023 ला आजपासून सुरुवात होत आहे. जगभरातील चित्रपटांचा समावेश असलेल्या महोत्सवाला दिग्गज ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास उपस्थित राहतेय. यासाठी प्रियांका मुंबईत दाखल झाली आहे.

MAMI Film Festival 2023
प्रियांका चोप्राचं मामी फेस्टीव्हलसाठी आगमन

मुंबई - MAMI Film Festival 2023 :अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास मुंबईत होत असलेल्या मामी फिल्म फेस्टीव्हलला उपस्थित राहण्यासाठी भारतात परतली आहे. विमानतळावर तिचं आगमन झाल्यानंतर पाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. एअरपोर्ट लूकसाठी तिनं काळ्या रंगाचा क्रॉप टॉप निवडला होता आणि लांब श्रग आणि मॅचिंग पॅंट घातली होती. विमानतळावर तिच्या स्वागतासाठी उभे असलेल्या पापाराझींना तिनं हात जोडून नमस्कार केला. मुंबईत आल्यानंतर तिनं इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या कार राईडची एक क्लिप चाहत्यांसाठी शेअर केलीय.

प्रियांका भारतात येण्यासाठी खूप उत्साही दिसत होती. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिनं पासपोर्ट अधिकृत कागदपत्रे असलेला एक फोटो शेअर करत मुंबईला येण्यासाठी निघत असल्याचं चाहत्यांना कळवलं होतं. मुंबईला निघण्यापूर्वी प्रियांकानं तिची मुलगी मालती मेरीसोबत तिच्या कारच्या प्रवासातील एक फोटो शेअर केला होता. चिमुकल्या मालतीनं आईचा हात घरलेला फोटोत दिसतोय. फोटोसोबत प्रियांकानं पृथ्वी आणि हृदयाचे इमोजी टाकले होते.

आंतरराष्ट्रीय जिओ मामी फिल्म फेस्टीव्हल 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत 10 दिवस चालणार आहे. यामध्ये जगभरातील 250 हून अधिक चित्रपटांचा समावेश असणार आहे. या यादीमध्ये जगातील काही प्रभावशाली चित्रपट आहेत. हा फेस्टिव्हल मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड सेंटर, कन्व्हेन्शन, थिएटर आणि कॉन्सर्ट हॉल कॉम्प्लेक्स येथे पार पडेल.

दक्षिण आशिया कार्यक्रमासाठी 1000 हून अधिक सबमिशनच्या रेकॉर्डब्रेक संख्येसह क्युरेशनमध्ये 40 पेक्षा जास्त वर्ल्ड प्रीमियर्स, 45 एशिया प्रीमियर्स आणि 70 हून अधिक दक्षिण आशिया प्रीमियर्स होणार आहेत. दक्षिण आशियातील समकालीन चित्रपट आणि नवीन सिनेमॅटिक चित्रपटांना उजेडात आणण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरतो. यंदाच्या महोत्सवामध्ये मुख्य स्पर्धा दक्षिण आशियायी चित्रपटामध्ये आहे.

या चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीचे सोलेब्रिटी सहभागी होतील. प्रियंका चोप्रा व्यतिरिक्त करीना कपूर खान, सोनम कपूर, करण जोहर, कमल हसन, मणिरत्नम, लुका गुआडिग्नो, हंसल मेहता, एकता कपूर, भूमी पेडणेकर, शोभिता धुलिपाला, अनुराग कश्यप, मानुषी छिल्लर, अली फजल आणि इतर नामांकित सेलिब्रिटींसह फिल्म इंडस्ट्रीतील चित्रपट निर्माते उपस्थित राहतील.

कामाच्या आघाडीचा विचार करता प्रियंका चोप्रा जोनास नुकतीच रुसो ब्रदर्सने तयार केलेल्या 'सिटाडेल' या वेब सिरीजमध्ये झळकली होती. 'हेड्स ऑफ स्टेट'मध्ये ती जॉन सीना आणि इद्रिस एल्बासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. 'नोबडी' चित्रपटाचे निर्माते इल्या नायशुलर हे जोश एपेलबॉम आणि आंद्रे नेमेक यांच्या स्क्रिप्टचे दिग्दर्शन करताहेत.

हेही वाचा -

  1. Rhea Chakraborty : सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं व्हिडिओ पोस्ट करून शेअर केला तुरुंगातील अनुभव...

2. Kangana Ranaut : कंगना राणौतनं 'तेजस' रिलीजपूर्वी घेतलं रामलल्लाचं दर्शन

3. Kapil Sharma Ad : जाहिरातीत कपिल शर्मानं केलं अक्षय कुमारला रिप्लेस; व्हिडिओ केला शेअर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.