ETV Bharat / city

ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधींवरील दाव्यावर सुनावणी २२ मार्चला; काय आहे प्रकरण? वाचा..

author img

By

Published : Mar 7, 2022, 3:36 PM IST

राहुल गांधी यांनी भिवंडीतील एका जाहीर सभेत एक वक्तव्य केले होते. त्यातून आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन या दाव्याची सुनावणी २२ मार्चला होणार असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

claim against rahul gandhi Bhiwandi Court
अवमान याचिका भिवंडी न्यायालय राहुल गांधी

ठाणे - खासदार राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले की, आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन या दाव्याची सुनावणी २२ मार्चला होणार असल्याचे न्यायाधीश जे.व्ही. पालीवाल यांनी सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना सांगितले.

हेही वाचा - ठाण्यात 13 व्या बासरी महोत्सवाचे आयोजन, 75 बासरी वादकांनी सादर केली कला

पक्षकारांच्या दोन्ही वकिलांची बाजू घेऊन आदेश

आज ७ मार्च रोजी भिवंडी न्यायालयामध्ये राजेश कुंठे विरुद्ध राहुल गांधी यांची मानहानीबाबत सुनावणी चालू असताना फिर्यादी तर्फे ॲड. प्रबोध जयवंत व ॲड. नंदू फडके यांनी बाजू मांडली. सदर दाव्यात फिर्यादीच्या वकिलांनी सांगितले की, अगोदर त्यांना नवी दिल्ली येथील नोटरी साक्षिदार तपासणे होते, परंतु न्यायालयाने फिर्यदीची तपासणी झाल्याशिवाय दुसरा साक्षिदार तपासण्यात येणार नाही, असे सांगून त्यांचा अर्ज नामंजूर केला. तसेच, सदर आदेशाविरुद्ध फिर्यादी यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे रीट दाखल केला असल्याने त्याची सुनावणी असल्याने फिर्यदीच्या वकिलांनी अर्ज दिला. यावर सुनावणी होऊन भिवंडी न्यायालयाने त्यांना शेवटची संधी देऊन पुढील तारीख २२ मार्च ठेवण्यात आलेली आहे.

राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. नारायण अय्यर यांनी आज बाजू मांडली. ॲड. नारायण अय्यर यांनी देखील राहुल गांधी हे गोवा, पंजाब व उत्तरप्रदेश येथे निवडणूक असल्याने ते व्यस्त असल्याने त्यांचा देखील गैरहजेरीचा अर्ज दिला. न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज मंजूर केला. भिवंडी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश जे.व्ही. पलीवाल यांच्या जलदगती न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा - एक भलामोठा साप क्लिनिकमध्ये, तर दुसरा वीजपुरवठा केंद्रात..पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.