ETV Bharat / city

एक भलामोठा साप क्लिनिकमध्ये, तर दुसरा वीजपुरवठा केंद्रात..पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Mar 6, 2022, 8:14 PM IST

हवामानात बदल होऊन उन्हाच्या झळा सुरू झाल्या. त्यामुळे, सापांनी भक्षासह थंड ठिकाणी मानवी वस्तीत आसरा घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आज भलामोठा साप एका मोठ्या क्लिनिकमध्ये तर, दुसरा महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशन कार्यालयात घुसल्याने दोन्ही ठिकाणी गोंधळ उडाला होता.

two snake found kalyan west area
कल्याण पश्चिम परिसर साप आढळला

ठाणे - हवामानात बदल होऊन उन्हाच्या झळा सुरू झाल्या. त्यामुळे, सापांनी भक्षासह थंड ठिकाणी मानवी वस्तीत आसरा घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आज भलामोठा साप एका मोठ्या क्लिनिकमध्ये तर, दुसरा महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशन कार्यालयात घुसल्याने दोन्ही ठिकाणी गोंधळ उडाला होता. या सापांना पाहून काहींच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते.

साप पकडतानाचे दृश्य

हेही वाचा - ६३६ पोलीस उपनिरीक्षकांच्या नेमणुकीचा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाकडून रद्द

क्लिनिकमधील रूममध्ये दडून बसला साप

पहिल्या घटनेत कल्याण पश्चिम भागातील खकडपाडा परिसरात हॉयप्रोफाईल क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये काही रुग्णांवर थेरीपी सुरू असतानाच आतल्या रूममध्ये भलामोठा साप एका नर्सला आढळून आला. तिने साप क्लिनिकमधील एका रूममध्ये दडून बसल्याची माहिती इतर कामगारांसह डॉक्टारांना देताच क्लिनिकमध्ये एकच गोंधळ उडून घबराटीचे वातावरण पसरले होते. साप क्लिनिकमध्ये घुसल्याची माहिती डॉक्टरने सर्पमित्र हितेशशी संपर्क करून देताच सर्पमित्र हितेश काही वेळातच क्लिनिकमध्ये दाखल होऊन त्याने सापाला शिताफीने पकडले. मात्र, साप पकडताच इतर नर्स घाबरून रुग्णांच्या बेडवर उभ्या राहिल्या होत्या. त्यानंतर सर्पमित्र हितेश याने सापाला पिशवीत बंद केले. साप पकडल्याचे पाहून क्लिनिकमधील सर्वांनी सुटेकचा निश्वास घेतला.

कामगारांनी कार्यलयाबाहेर काढला पळ

दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिम भागातील दुर्गाडी किल्ल्या नजिक महावितरणचे वीजपुरवठा करणारे सब स्टेशन कार्यलय आहे. या कार्यलयात एक वीज कामगार काम करत असताना त्याने भलामोठा साप कार्यलयात घुसताना पाहिला. त्याने इतर कामगारांना कार्यलयात साप घुसल्याची माहिती दिली. यामुळे येथील सर्व कामगारांनी कार्यलयाबाहेर पळ काढला होता. त्यानंतर साप कार्यलयात घुसल्याची माहिती सर्पमित्र हितेशला मिळताच त्याने या सापालाही शिताफीने पकडून पिशवीत बंद केले.

सापांना निर्सगाच्या सानिध्यात सोडणार

दोन्ही साप ६ फूट लांबीचे असून धामण जातीचे आहे. हे साप भक्ष्याच्या शोधात दोन्ही ठिकाणी शिरल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली असून, वन विभागाच्या परवानगीने या सापांना निर्सगाच्या सानिध्यात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली.

हेही वाचा - ठाण्यात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.