ETV Bharat / city

Naresh Mhaske : बोगस प्रतिज्ञापत्रावरून नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरेंवर लगावला टोला

author img

By

Published : Oct 9, 2022, 7:17 AM IST

Updated : Oct 9, 2022, 1:17 PM IST

ठाण्यात सुमारे ४६८२ बनावट प्रतिज्ञापत्रे आढळली आहेत. या पत्रांचा वापर करून निवडणूक आयोगाला देण्यासाठी झाला असावा, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून उद्धव गटाकडून देण्यात आलेले प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप (Shiv Sainiks submit fake stamps) करत, एकनाथ शिंदे गटाकडून नरेश मस्के यांनी शिवसेनेवर टोला लगावला आहे.

Naresh Mhaske Spokesperson Shinde Group
नरेश म्हस्के प्रवक्ते शिंदे गट

ठाणे - शिवसेनेचे धनुष्य बाण चिन्ह गोठविले ( shiv sena party symbol ) असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाण्यात सुमारे ४६८२ बनावट प्रतिज्ञापत्रे आढळली आहेत. या पत्रांचा वापर करून निवडणूक आयोगाला देण्यासाठी झाला असावा, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून उद्धव गटाकडून देण्यात आलेले प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप (Shiv Sainiks submit fake stamps) करत, एकनाथ शिंदे गटाकडून नरेश मस्के यांनी शिवसेनेवर टोला लगावला आहे.

बनावट प्रतिज्ञापत्रांविरूद्ध तक्रार - कोणीतरी अज्ञात इसमांनी स्टॅम्प पेपरवर ( fake stamp for affidavit ) नाव असलेल्या लोकांच्या आधारकार्डची प्रत व फोटो प्राप्त करून ते स्टॅम्प पेपरसोबत जोडण्यात आले. अशा पद्धतीने बनावट प्रतिज्ञापत्र तयार करून मोठ्या प्रमाणात शपथपथांचे बनावटीकरण झाल्याची तक्रार निर्मलनगर पोलीस ठाणे, मुंबईत दाखल करण्यात आली आहे. संजय परशुराम कदम असे तक्रारदाराचे नाव आहे.

प्रतिक्रिया देताना नरेश म्हस्के प्रवक्ते शिंदे गट

सत्ता संघर्षाचे वेगळे वळण - महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता वेगळे वळण घेत आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर दोन गट निर्माण झाले. शिंदे गट भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन सत्तेमध्ये आला. यानंतर उद्धव गटाकडून आणि शिंदे गटाकडून शिवसेना कोणाची ? असा प्रश्नच संपूर्ण महाराष्ट्राला पडला. याच सत्ता संघर्षाचा पेच हा अनेक दिवस न्यायालयामध्ये सुरू होता. मात्र न्यायालयांमधून निकाल आल्यानंतर निवडणूक आयोगाकडे याची संपूर्ण धुरा सोपवण्यात आली.

नरेश मस्केंचा ठाकरे गटाला टोला - संपूर्ण कागदपत्र दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आले. यामध्ये प्रतिज्ञापत्रांचा देखील समावेश होता. मात्र शिवसेनेकडून उद्धव गटाकडून देण्यात आलेले प्रतिज्ञापत्र बोगस असल्याचा आरोप करत, एकनाथ शिंदे गटाकडून नरेश मस्के यांनी शिवसेनेवर टोला लगावला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत असल्याचे नरेश मस्के यांनी (Naresh Mhaske Spokesperson Shinde Group) सांगितले.

Last Updated : Oct 9, 2022, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.