ETV Bharat / city

Maratha Reservation : 2 सप्टेंबरला राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

author img

By

Published : Aug 31, 2021, 8:10 PM IST

Updated : Aug 31, 2021, 8:27 PM IST

मराठा क्रांती संघर्ष मोर्चा आणि शिवसंग्राम संघटनेच्यावतीने राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Maratha Reservation
संग्रहित फोटो

पुणे - मराठा क्रांती संघर्ष मोर्चा तसेच शिवसंग्राम संघटनेच्यावतीने पुणे जिल्हा यांच्यावतीने, मराठा आरक्षण तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २ सप्टेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसंग्रामचे तुषार काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तुषार काकडे - पदाधिकारी, शिवसंग्राम संघटना

हेही वाचा - महाराष्ट्रात राजकीय काला : दहीहंडी, आगामी सणांवरुन राज्य सरकार-विरोधक संघर्ष पेटणार?

  • मंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा -

सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षणाबाबत निकाल दिला होता. त्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांमध्ये आक्रोश निर्माण झाला. एवढे करूनही जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर मग आम्ही करायचे काय? असा प्रश्न मराठा समाजाच्या तरुणांमध्ये निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईत सरकारच्यावतीने कमी पडलेले मंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी धरणे आंदोलनात करणार आहोत. तसेच मागासवर्गीय आयोगातील सदस्य हे मराठा आरक्षणाला विरोध करणारे आहेत. त्यामुळे हा आयोग बरखास्त करून नवीन सदस्य निवडण्यात यावे, अशी देखील मागणी यावेळी करण्यात येणार आहे, असे तुषार काकडे यांनी सांगितले आहे.

  • राज्यभर करण्यात येणार आंदोलन -

मराठा क्रांती संघर्ष मोर्चा आणि शिवसंग्राम संघटनेच्यावतीने राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई येथे देखील हे आंदोलन होणार असून, या आंदोलनाला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्य सरकारच्या हातात ज्याज्या गोष्टी आहे, ते त्यांनी कराव्या. सारथी संस्थेला मजबूत करण्यात यावे. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाला 500 ते 1000 कोटी रुपयांचा निधी देऊन त्यांना त्याचे अधिकार देण्यात यावे आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जे-जे करता येईल ते करावे, अशी देखील मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. असे देखील यावेळी काकडे यांनी सांगितले.

हेही वाचा - भारत अफगाणिस्तानच्या घडामोडीत गुंग; चीनकडून हिंद महासागारात पोहोचण्याचा नवा मार्ग खुला

Last Updated : Aug 31, 2021, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.