ETV Bharat / city

Ram Navami 2022 : राज्यपाल कोश्यारी आणि छगन भुजबळांनी घेतले काळारामाचे दर्शन

author img

By

Published : Apr 10, 2022, 11:02 AM IST

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ( Governor Koshyari visited Kalaram temple Nashik ) रामनवमीनिमित्त ऐतिहासिक पेशवेकालीन काळारामाचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी प्रभू रामाची विधिवत पुजा करून आशीर्वाद घेतला.

Governor Koshyari visited Kalaram temple nashik
राज्यपाल कोश्यारी काळाराम मंदिर भेट नाशिक

नाशिक - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ( Governor Koshyari visited Kalaram temple Nashik ) रामनवमीनिमित्त ऐतिहासिक पेशवेकालीन काळारामाचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी प्रभू रामाची विधिवत पुजा करून आशीर्वाद घेतला. राज्यपालांच्या दौर्‍यात काळाराम दर्शन भेट उल्लेख नव्हता, पण अचानक हा दौरा ठरविण्यात आला.

प्रतिक्रिया देताना राज्यपाल कोश्यारी

हेही वाचा - Nashik ETV Bharat Special Story : धरणांच्या जिल्ह्यात स्त्रियांची हंडाभर पाण्यासाठी रात्रभर वणवण भटकंती

संपूर्ण भारतात राम नवमी साजरी केली जात आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी श्रीरामाचे दर्शन घेऊन विधीवत पूजा केली. मी या पवित्र ठिकाणी पुन्हा येऊ शकणार की नाही, माहीत नाही. परंतु, राम नवमीच्या पवित्र दिवशी मला हे भाग्य मिळाले याचा आनंद होत आहे, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले. प्रभू रामचंद्राचे पावन स्पर्श असलेली भूमी नाशिक येथे कोरोनाच्या संकटाच्या तब्बल दोन वर्षांनंतर आज रामनवमीच्या दिवशी श्री. काळाराम मंदिरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली.

मागील गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचे संकट पसरलेले असताना आज नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात राज्यपाल कोश्यारी आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पूजाविधी करण्यात आली. येथे नागरिकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली आहे. काळाराम मंदिरात महाआरती करून दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

हेही वाचा - Chhagan Bhujbal on Silver Oak Attack : कर्मचाऱ्यांना भडकवणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी - मंत्री छगन भुजबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.