ETV Bharat / city

Vinayak Mete Slammed Shivsena : लग्न एकासोबत आणि संसार दुसऱ्यासोबत-विनायक मेटेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका

author img

By

Published : Apr 4, 2022, 3:04 PM IST

Updated : Apr 4, 2022, 3:21 PM IST

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक विनायक मेटे ( Shiv Sangram Party founder Vinayak Mete ) म्हणाले, की गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांचे भाषण झाले. ते पूर्णपणे आघाडी सरकारचे लक्तरे काढणार ( Vinayak Mete reaction on Raj Thackeray speech ) होते. सध्याच्या राज्यातील सत्ता समीकरणावर भाष्य करणारी ( Political situation in Maharashtra ) त्यांनी वस्तुस्थिती मांडली.

विनायक मेटे
विनायक मेटे

नागपूर - लग्न एकासोबत करायचे आणि संसार दुसऱ्या सोबत करायचा. हे घडल्याची महाराष्ट्राची शोकांतिका आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक विनायक मेटे यांनी शिसनेवर अप्रत्यक्ष टीका केली. ते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ( Vinayak Mete meet Raj Thackeray meet ) माध्यमांशी बोलत होते.

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक विनायक मेटे ( Shiv Sangram Party founder Vinayak Mete ) म्हणाले, की गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांचे भाषण झाले. ते पूर्णपणे आघाडी सरकारचे लक्तरे काढणार ( Vinayak Mete reaction on Raj Thackeray speech ) होते. सध्याच्या राज्यातील सत्ता समीकरणावर भाष्य करणारी ( Political situation in Maharashtra ) त्यांनी वस्तुस्थिती मांडली. काम करणाऱ्या माणसाला बाजूला ठेवण्याच काम काही लोकांनी जाणीवपूर्वक केले, असेही मेटे म्हणाले. भाषणात राज ठाकरे बोलताना म्हणाले, कोणासोबत पळून जाते. लग्न दुसऱ्यासोबत केले. यावर मेटे म्हणाले की त्याऐवजी मी असे म्हणेल लग्न एकासोबत केले. संसार दुसऱ्या सोबत केला. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मात्र काही लोकांनी ही संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला, अशी त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली.

विनायक मेटेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका

भाषणात राज ठाकरे काय म्हणाले? - राज यांनी भाषणात सुरूवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेने भाजपसोबत युती केली अन् (2019)च्या निवडणुका लढविल्या. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांच्या विरोधात निवडणुका लढवत होते. दरम्यान, प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, गृहमंत्री अमित शहा आले, यांच्या सभेत स्टेजवर उद्धव ठाकरे होते. (Raj Thackeray Speech at Shivaji Park) मात्र, त्यांनी कधीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबद बोलण झाल आहे, अशी उघड कबूली दिली नाही. मात्र, जेव्हा निवडणुका झाल्या अन् त्यांना वाटले की आपल्यामुळे सरकार अडकतय तेव्हा त्यांना या अडीच वर्षाचा साक्षात्कार झाला असा हल्ला राज यांनी केला. (Raj Thackeray Criticism Of Sharad Pawar) जनतेसाठी असणाऱ्या मुख्यमंत्रीपदाची बोलणी चार भींतीच्या आत कशी करता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मतदारांची फसवणुक जर कोणी केली असेल तर ती शिवसेनेने केली आहे असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

हेही वाचा-मुंबई बँक फसवणूक प्रकरणी प्रवीण दरेकरांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू

हेही वाचा-Sanjay Raut On BMC : कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले तरी मुंबई मनपा आम्ही जिंकू -राऊत

हेही वाचा-Anil Deshmukh At Hospital : माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे जे रुग्णालयात दाखल


Last Updated : Apr 4, 2022, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.