ETV Bharat / city

मुंबई बँक फसवणूक प्रकरणी प्रवीण दरेकरांची मुंबई पोलिसांकडून चौकशी संपली

author img

By

Published : Apr 4, 2022, 11:39 AM IST

Updated : Apr 5, 2022, 6:10 AM IST

भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँक फसवणूक प्रकरणी आज मुंबई पोलिसांकडून ( Praveen Darekar to be questioned by Mumbai Police ) चौकशी झाली. प्रवीण दरेकर रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यांची चौकशी दुपारी तीन वाजता संपली.

Praveen Darekar to be questioned by Mumbai Police
प्रवीण दरेकर मुंबई पोलीस चौकशी

मुंबई - भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँक फसवणूक प्रकरणी आज मुंबई पोलिसांकडून ( Praveen Darekar to be questioned by Mumbai Police ) चौकशी झाली. प्रवीण दरेकर रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. त्यांची चौकशी दुपारी तीन वाजता संपली.

हेही वाचा - MNS-BJP Alliance ? : सध्या युतीची चर्चा नाही! मात्र यांना का मिर्चा झोंबतात; मनसे नेत्याचे ट्विट

आपचे कार्यकर्ते धनंजय शिंदे यांच्याकडून याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती. नंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. पोलीस ठाणे परिसरात भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे दरेकर यांना अटकेपासून संरक्षण दिले होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँक फसवणूक प्रकरणात रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पुढील सुनावणी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. रमाबाई पोलीस स्टेशनकडून प्रवीण दरेकर यांना 4 एप्रिल रोजी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले होते.

आम आदमी पक्षाच्या वतीने धनंजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मजूर नसतानाही प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँक संचालक पदाची निवडणूक लढवली. त्या माध्यमातून दरेकर यांनी मुंबै बँकेचे ठेवीदार, प्रशासन आणि सरकार यांची 20 वर्षे फसवणूक केली, असा आरोप दरेकर यांच्यावर आहे. प्रवीण दरेकर यांना सोमवारी (दि.4) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश आहेत. प्रवीण दरेकर हे मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून 1997 पासून मुंबै बँकेवर निवडून येत आहेत. दरेकर हे नागरी सहकार बँक आणि मजूर अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. त्याची मुंबै बँकेवर संचालक म्हणूनही बिनविरोध निवड झाली होती. प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे.

काय आहे प्रकरण? : 20 वर्षे मजूर प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर निवडून येणारे प्रवीण दरेकर हे मजूर नाहीत, अशी तक्रार आपचे नेते धनंजय शिंदे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीअंती 3 जानेवारी 2022 रोजी विभागीय सहनिबंधकांनी प्रवीण दरेकर यांना मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवले.

हेही वाचा - VIDEO : मुंबईतील एका अवलियाने दगडांना दिला 'चेहरा', केलेतून निर्माण केली वेगळी ओळख

Last Updated : Apr 5, 2022, 6:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.