ETV Bharat / city

Maharashtra IPS Officers Transferred : राज्यातील महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कृष्ण प्रकाश, दीपक पांडेंचाही समावेश

author img

By

Published : Apr 20, 2022, 10:53 PM IST

राज्य सरकारने राज्यातील महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या ( Maharashtra IPS Officers Transferred ) आहेत. यामध्ये भोंग्यावरून कारवाईचा इशारा देणारे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे ( IPS Deepak Pandey Transferred ) आणि वेषांतर करत कारवाई करणारे कृष्ण प्रकाश ( IPS Krishna Prakash Transferred ) यांचाही समावेश आहे.

Krishna Prakash Deepak Pandey
कृष्ण प्रकाश दीपक पांडे

मुंबई - भोंग्यांच्या बंदीवर राज्य सरकारच्या निर्णयापूर्वी कारवाईचा इशारा देणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली ( IPS Deepak Pandey Transferred ) आहे. तर वेषांतर करून गुन्हेगारांना पकडणाऱ्या पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचीही अतिमहत्वाच्या सुरक्षा पदावर नियुक्ती करण्यात आली ( IPS Krishna Prakash Transferred ) आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्ल्यानंतर हे फेरबदल करण्यात आले ( Maharashtra IPS Officers Transferred ) आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय : याशिवाय, इतर भारतीय पोलीस सेवा पदावरील २ विशेष पोलीस महानिरीक्षक, ६ पोलीस अधीक्षकांचा खांदेपालट करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे.

पुण्याचे सहआयुक्तही बदलले : नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्यावर महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यांच्या इशाऱ्यानंतर थेट कारवाईचा निर्णय ( Loudspeaker Issue Nashik ) घेतला. या निर्णयावर आघाडी सरकार नाराज असल्याचे समजते. त्यामुळे नाशिकच्या पोलिस आयुक्त पदावरून दीपक पांडे यांची बदली केल्याचे बोलले जाते. तर पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे ( IPS Rajendra Shisave ) यांची राज्य मानवी आयोगाच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर ठाणे शहराचे सहपोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला ( IPS Sureshkumar Mekala ) यांची बदली पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी केली आहे. मुंबई सशस्त्र पोलीस दलाचे अप्पर पोलीस आयुक्त वीरेंद्र वर्मा ( IPS Virendra Varma ) यांची बदली उत्तर प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्त पदी करण्यात आली आहे. याशिवाय ११ पोलीस उपनिरीक्षक, २ विशेष पोलीस महानिरीक्षक, ६ पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कृष्ण प्रकाश डॅशिंग अधिकारी : वेशांतर करून गुन्हेगारीला आळा घालणारे पोलीस अधिकारी म्हणून कृष्ण प्रकाश यांचं नाव आघाडीवर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अनेक कारवाया केल्या आहेत. त्यांची बदली मुंबईत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हे फेरबदल केल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : Maharashtra Police Officers Transfer : संदीप कर्णिक पुण्याचे नवे पोलीस सहआयुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.