ETV Bharat / city

Maharashtra Police Officers Transfer : संदीप कर्णिक पुण्याचे नवे पोलीस सहआयुक्त

author img

By

Published : Apr 20, 2022, 9:19 PM IST

Updated : Apr 20, 2022, 9:44 PM IST

महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने बुधवारी (दि. 20 एप्रिल) राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे परिपत्रक काढले ( Maharashtra Police Officers Transfer ) आहे. या परिपत्रकानुसार संदीप कर्णिक ( Sandeep Karnik ) यांची पुण्याचे नवीन पोलीस सहआयुक्त ( Joint Police Commissioner of Pune ) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

संदीप कर्णिक
संदीप कर्णिक

मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने बुधवारी (दि. 20 एप्रिल) राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे परिपत्रक काढले ( Maharashtra Police Officers Transfer ) आहे. या परिपत्रकानुसार संदीप कर्णिक ( Sandeep Karnik ) यांची पुण्याचे नवीन पोलीस सहआयुक्त ( Joint Police Commissioner of Pune ) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

कोण आहेत संदीप कर्णिक - संदीप कर्णिक हे सध्या बृहन्मुंबईच्या पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलीस आयुक्त आहेत. तर त्यांची वर्णी आता पुण्याचे सहपोलीस आयुक्तपदी लागली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक पदाच्या दर्जावरुन विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदावर पदोन्नती देण्याकरीताच्या प्रक्रियेतून कर्णिक यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

संदीप कर्णिक हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतानाच मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. या संपूर्ण घटनेची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली होती. त्यानंतर संदीप कर्णिक यांची तातडीने बदली करण्यात आली होती. संदीप कर्णिक आता पुण्याचे नवे सहपोलीस आयुक्त असणार आहेत.

डॉ. रविंद्र शिसवे यांची मुंबई बदली - दुसरीकडे पुण्याचे विद्यमान सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची मुंबईच्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. गृह विभागाचे सहसचिव वेंकटेश भट यांनी याबाबतचे आदेश बुधवारी जारी केले आहेत.

नाशिकचे पोलीस आयुक दीपक पांडे यांचीही बदली - नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचीही बदली करण्यात आली ( Nashik Police Commissioner Deepak Pandey Transfer ) असून त्यांच्या जागी जयंत नाईकनवरे ( Jayant Naiknavare is new Police Commissioner of Nashik ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक पांडे यांची महिला अत्याचा प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. नाईकनवरे यांनी राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या पदावर काम केले आहे. त्यांचा मोठा अनुभव आहे.

हेही वाचा - Raghunath Kuchik Case : पीडितेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; प्रकरणात लक्ष घालण्याची केली मागणी

Last Updated : Apr 20, 2022, 9:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.