ETV Bharat / city

दहशतवाद्यांची मुंबई लोकल आणि गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याची होती तयारी - मुंबई एटीएस

author img

By

Published : Oct 8, 2021, 6:07 PM IST

मुंबई एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, झाकीर शेख शेजारच्या देशातील नागरिक असलेल्या अँथनीच्या संपर्कात होता. एटीएस अँथनी आणि दहशतवाद्याच्या कटातील त्याच्या भूमिकेविषयी माहिती गोळा करत आहे. महाराष्ट्र एटीएसच्या म्हणण्यानुसार, झाकीरसह अनेक दहशतवादी मुंबईच्या लोकल ट्रेनसह अनेक गर्दीच्या भागात स्फोट घडवून आणण्याची योजना आखत होते.

terrorists were preparing to blow up Mumbai locals and crowded places - Mumbai ATS
दहशतवाद्यांची मुंबई लोकल आणि गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याची होती तयारी - मुंबई एटीएस

मुंबई - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी ६ जणांना उत्तर भारतात विविध ठिकाणांहून अटक केली. त्यात धारावीच्या जान मोहम्मदचा देखील समावेश होता. त्यांच्यानंतर सक्रिय झालेल्या महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली होती. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकासोबत केलेल्या या संयुक्त कारवाईत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. झाकिर शेख असे त्याचे नाव आहे.

दहशतवाद्यांची मुंबई लोकल आणि गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याची होती तयारी - मुंबई एटीएस

जोगेश्वरीतून केली होती झाकिर शेखला अटक -

दिल्ली पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी मोठी कारवाई करत ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. जान महंमद शेख (वय ४७, महाराष्ट्र), ओसामा ऊर्फ सामी (वय २२, जामियानगर), मूलचंद ऊर्फ साजू (वय ४७, रायबरेली), झिशान कमर (वय २८, अलाहाबाद), महंमद अबू बकर (वय २३, बहराइच), महंमद अमीर जावेद (३१, लखनऊ) अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. १९९३ साखळी बॉम्ब स्फोटांप्रमाणेच पुन्हा स्फोट घडवून आणण्याचा त्यांचा कट असल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी देखील धडक कारवाई केली आहे. जोगेश्वरीमधून अटक केलेल्या केलेला दहशतवाद्याकडून महत्वाची माहिती समोर आली आहे.

लोकल ट्रेनसह गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याची योजना -

मुंबई एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, झाकीर शेख शेजारच्या देशातील नागरिक असलेल्या अँथनीच्या संपर्कात होता. एटीएस अँथनी आणि दहशतवाद्याच्या कटातील त्याच्या भूमिकेविषयी माहिती गोळा करत आहे. महाराष्ट्र एटीएसच्या म्हणण्यानुसार, झाकीरसह अनेक दहशतवादी मुंबईच्या लोकल ट्रेनसह अनेक गर्दीच्या भागात स्फोट घडवून आणण्याची योजना आखत होते. यासाठी या ठिकाणांची रेकी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची सूत्रे दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दाऊदचा भाऊ अनीस आरोपीच्या माध्यमातून गुन्हे घडवण्याचा प्रयत्न करत होता.

गर्दीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त -

दाऊद इब्राहिम कडून फंडिंग पुरवले जात असल्याची माहिती या चौकशीतून समोर आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. सुरक्षेच्या बाबतीत मुंबईतील सर्वात संवेदनशील स्थळ म्हणून मंत्रालय परिसर गणला जातो. मुंबई आतंकवादी संघटनेच्या टार्गेटवर असल्याची माहिती समोर आल्यानंतर मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा - एटीएसने झाकीर शेखला घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.