ETV Bharat / city

मुंबईत घातपाती कारवायांचा कट; कशी आहे मुंबईची सुरक्षा 'ईटीव्ही'चा ग्राऊंड रिपोर्ट

author img

By

Published : Oct 8, 2021, 3:51 PM IST

Updated : Oct 8, 2021, 8:14 PM IST

मुंबईमध्ये घातपात घडवण्याचा कट रचला जात असून मुंबई लोकल या दहशतवादी कारवायांच्या टार्गेटवर होती. या कारवायांसाठी दाऊद इब्राहिमकडून फंडिंग पुरवलं जात असल्याचेही या चौकशीतून समोर आले आहे. नुकतेच एटीएसने जाकीर शेखला अटक केले.

zakir shaikh arrested by  ats in mumbai
एटीएसने झाकीर शेखला घेतले ताब्यात

मुंबई - महाराष्ट्र एटीएसने 17 सप्टेंबरला जाकीर शेखला मुंबईतील जोगेश्वरी येथून अटक केली. समीर कालिया याच्या चौकशीतून जाकीर शेखचे नाव समोर आले आहे. त्यानंतर एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली. जाकीर शेख याचे संबंध थेट पाकिस्तान आणि दाऊद इब्राहिम टोळीशी असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

एटीएसने झाकीर शेखला घेतले ताब्यात

मुंबईमध्ये घातपात घडवण्याचा कट रचला जात होता. तसेच मुंबई लोकलही या दहशतवादी कारवायांच्या टार्गेटवर होती. या कारवायांसाठी दाऊद इब्राहिमकडून फंडिंग पुरवलं जात असल्याची माहिती या चौकशीतून समोर आली आहे. यानंतर मुंबईतील महत्त्वाची ठिकाणची सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या बाबतीत मुंबईतील सर्वात संवेदनशील स्थळ म्हणून मंत्रालय परिसर गणला जातो. परिणामी या ठिकाणचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

याआधीही ठाण्यात केली होती कारवाई

मुंबई दहशतवादी विरोधी पथकाच्या कारवाईनंतर अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात मुंब्रा येथील एक तरुण होता. तो संशयास्पद दहशतवाद्याचा मित्र असल्यामुळे त्याला दहशदवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते.

हेही वाचा - Cruise Drug Case LIVE : आर्यन खान आर्थर रोड कारागृहात दाखल; जामिनावर जोरदार युक्तिवाद सुरू

Last Updated : Oct 8, 2021, 8:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.