ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis: शिवसेना ७ मंत्र्यांच्या निलंबणाची राज्यपालांकडे करणार मागणी

author img

By

Published : Jun 26, 2022, 11:44 AM IST

शिवसेनेकडून बंडखोर नेत्यांना आणि आमदारांना अपात्र ठरवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. आता शिवसेनेच्या ७ मंत्र्यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेनेकडून ( Shiv Sena demands suspension of 7 ministers ) राज्यपालांकडे करण्यात येणार आहे. अशी माहिती नुकतीच समोर आली आहे.

SENA LETTER GOVERNER
SENA LETTER GOVERNER

मुंबई - शिवसेनेकडून बंडखोर नेत्यांना आणि आमदारांना ( Rebel MLA Of Shiv Sena ) अपात्र ठरवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. आता शिवसेनेकडून ७ मंत्र्यांना निलंबित करण्याची मागणी ( Shiv Sena demands suspension of 7 ministers ) राज्यपालांकडे करण्यात येणार आहे. अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. याआधी शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवावे तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यपालांकडे ७ मंत्र्यांना निलंबनाची मागणी करण्यात आल्याने वातावरण आणखी ढवळून निघाल्याचे चित्र आहे.

आमदारांना अपात्र तर मंत्र्यांचे निलंबन ? - परिणामी मंत्री एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shinde ) बरोबर बंडखोरी करणाऱ्या आमदारांसोबत आता मंत्र्यांचेही टेन्शन वाढले ( Ministers Are In Trouble ) आहे. एकीकडे १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र देण्यात आले आहे. त्यावर ४८ तासांच्या आत आमदारांनी आपले मत मांडावे अशी नोटीस उपाध्यक्षांनी १६ आमदारांना पाठवले आहे. तर आता दुसरीकडे शिवसेनेच्या ७ मंत्र्यांना निलंबित करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. निलंबित करण्याची मागणी करण्यात आलेल्या या ७ मंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराजे देसाई व बच्चू कडू यांचा समावेश आहे.

हेही वाचा -शिवसेनेची बंडखोरांबाबत कठोर भूमिका; वाचा, काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी

मंत्री आणि खाती

एकनाथ शिंदे - नगर विकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम )

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री.

दादाजी दगडू भुसे - कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री.

संदिपान भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री.

राज्यमंत्री -

अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीनी विकास, विशेष सहाय्य खाते.

शंभूराजे देसाई - गृह (ग्रामीण) वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन.

बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पक्ष) - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार.

हेही वाचा - Sanjay Raut Slammed Eknath Group : धमक असेल तर राजीनामे द्या, निवडणुकीला सामोरे जा- संजय राऊत

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगसिंग कोश्यारींना करोनाची लागण झाल्या कारणाने ते मुंबईतील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होते. आजच रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला ( governor Got discharge ) आहे. त्यामुळे आता राज्यपालांना डिस्चार्ज भेटल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठ्याप्रमाणात वेग आला आहे. राज्यपालांकडे शिवसेनेचे हे पत्र गेल्यानंतर राज्यपाल बंडखोर आमदारांवर आमि नेत्यांवर काय कारवाई करतात? हे बघणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - बंडखोर आमदार बैठकीसाठी तयार, गुवाहाटीतील एकत्रित आमदारांचा फोटो आला समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.