ETV Bharat / city

Eknath Shinde : शिवसेनेत उभी फूट दाखवण्याचा शिंदेंचा प्रयत्न!

author img

By

Published : Jul 19, 2022, 5:15 PM IST

Updated : Jul 19, 2022, 5:31 PM IST

Eknath Shinde
Eknath Shinde

राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करून शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Shiv Sena rebel leader and Chief Minister Eknath Shinde ) यांनी एक प्रकारे न्यायालयाला आव्हानच दिले आहे. मात्र त्यांनी उचललेली पावले किती कायदेशीर विचार बरोबर आहे हे न्यायालय आणि विधानसभेतच स्पष्ट होईल, अशा प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत.

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन शिवसेनेच्या बारा खासदारांना आपल्या गोटात सामील करत आपण सर्व स्तरावर शिवसेनेत मोठा गट आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करून शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Shiv Sena rebel leader and Chief Minister Eknath Shinde ) यांनी एक प्रकारे न्यायालयाला आव्हानच दिले आहे. मात्र त्यांनी उचललेली पावले किती कायदेशीर विचार बरोबर आहे हे न्यायालय आणि विधानसभेतच स्पष्ट होईल, अशा प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत.

राजकीय विश्लेषकांनी दिलेल्या प्रतिक्रिया


'राष्ट्रीय कार्यकारिणीची वैधता शंकास्पद' : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार फोडत आपला गट प्रबळ असल्याचे दाखवले आहे. त्याबरोबर त्यांनी शिवसेनेचा राष्ट्रीय कार्यकारिणीला बरखास्त करणे, स्वतःची राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली आहे. मात्र ही नवी राष्ट्रीय कार्यकारिणी कायद्याच्या चौकटीत बसेल अथवा त्याला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त होईल, अशी सद्यस्थिती नाही. शिवसेना पक्ष हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नावाने नोंदणीकृत पक्ष आहे. त्यामुळे अद्यापही शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचेच निर्णय अंतिम असते. मात्र केवळ कायद्याची आणि न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी स्थापन केली असल्याचे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले आहे.



'शिंदे यांचे न्यायालयालाच आव्हान' : एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा गट सोडल्यानंतर शिवसेनेवर दावा सांगितला. मात्र शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी पक्षात उभी फूट पडणे आवश्यक असते तरच पक्षावर दावा सांगता येतो. यासाठीच एकनाथ शिंदे सर्व प्रयत्न करीत असल्याचे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषण अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करीन स्वतःची राष्ट्रीय कार्यकारणी स्थापन करून पक्षात उभी फूट असल्याचे दाखवले आहे. त्या पाठोपाठ आता बारा खासदार आपल्या गोटात सामील करत आपणच सर्व स्तरावर मग आमदारासोबत खासदार असो माजी नगरसेवक असो की पक्षातील कार्यकर्ते सर्व बाबतीत आपण मोठे आहोत आणि म्हणूनच पक्षावर आपला दावा आहे. हे सुनावणीपूर्वी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे न्यायालयावर दबाव येईल, अशी त्यांची कल्पना आहे. मात्र त्यांना विधानसभेतही हे सिद्ध करावे लागणार आहे, असेही जोशी म्हणाले.

हेही वाचा - Varun Sardesai : शिंदे गटाचा शिवसेनेला आणखी एक धक्का; युवासेनेच्या वरून सरदेसाईंची सचिव पदावरुन हकालपट्टी

Last Updated :Jul 19, 2022, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.