ETV Bharat / city

Cruise Drug Case : आर्यन खानच्या जामिनावर सुनावणी सुरु, मात्र आर्यन आर्थर रोड कारागृहाकडे रवाना

author img

By

Published : Oct 7, 2021, 8:16 PM IST

Updated : Oct 8, 2021, 1:19 PM IST

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या 'कॉर्डिया द क्रूझ'वर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस, २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनलाही अटक करण्यात आली होती.

file photo
फाईल फोटो

मुंबई - मुंबई ते गोवा जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्स पार्टी चालू असल्याची माहिती मिळाल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी रात्री छापा टाकला होता. यात शाहरुख खान याचा मुलगा आर्यनसह आठ जणांना अटक केली होती. तसेच काल (7 ऑक्टोबर) या आठ जणांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड (किल्ला कोर्ट) यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी आरोपींचे वकील आणि एनसीबीच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायाधीश आर. एम. निर्लेकर यांनी आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचासह आठ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी आर्यन खानसह इतर आरोपींच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, यावर किला न्यायालयात सुनवाई सुरु झाली आहे. सर्व पक्षांचे वकील न्यायालयात हजर झाले असून एनसीबीचे अधिकारीही न्यायालयात आले आहेत. आर्यनला जेल मिळेल की बेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, आर्यन खानला आर्थर रोड कारागृहात हलविण्यात येत आहे. एनसीबी टीमने त्याला आर्थर रोड कारागृहात हलविण्याची तयारी सुरु केली आहे.

  • आज पुन्हा कोर्टात केले हजर -

क्रूझवर झालेल्या पार्टी प्रकरणी आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धामेचा यांच्यासह आठ जणांना शनिवारी एनसीबीने ताब्यात घेतले होते. यापैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धामेचा यांना रविवारी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड (किल्ला कोर्ट) म्हणजेच एडिशनल चीफ मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट एस्प्लनेड येथे हजर करून एक दिवसाची कोठडी मिळवली होती. सोमवरी पुन्हा आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धामेचा यांच्यासह आठ जणांना कोर्टात हजर केले असता, त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली. आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले.

  • आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांचा कालचा युक्तिवाद -

आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी युक्तिवाद करताना एनडीपीएस कायद्याच्या कलम 67 नुसार केस स्टेटमेंटचा वापर केवळ तपासासाठी केला जाऊ शकतो. मी रविवारी एका दिवसाच्या रिमांडसाठी तत्परतेने सहमती दर्शवली होती. 4 ऑक्टोबरपासून संबंध नसलेल्या आरोपींच्या अटकेशिवाय काहीही झाले नाही. एनसीबी नवीन नवीन व्यक्तींना अटक करत आहे. त्यांचा आर्यनशी काही सबंध नाही. एनसीबीने आता क्रूझमधील पार्टी आयोजकांना अटक केली आहे. आता जहाजातील इतर कोणाशीही माझे कोणतेही संबंध असल्यास षड्यंत्र होईल का? असा प्रश्न मानेशिंदे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - VIDEO : अशा लोकांनी कायमच पाकिस्तानला मदत केली, प्रज्ञासिंह ठाकूर यांची शाहरुख खानवर टीका

  • न्यायालयीन कोठडीची केली होती मागणी -

आर्यनला त्याचा मित्र प्रतिक गाबा याने क्रूझवर व्हिआयपी म्हणून आमंत्रित केले होते. कदाचित बॉलिवूडमधील क्रूझमध्ये ग्लॅमर जोडण्यासाठी आर्यनला आमंत्रित केले असावे. सर्व प्रवासी रेव्ह पार्टीमध्ये सहभागी होते, यामुळे हे आर्यनचे एकट्याचे प्रकरण नाही. प्रतिकसोबत आर्यनचे चॅट आहेत, या चॅटमध्ये रेव्ह पार्टीचा उल्लेख केलेला नाही. प्रतिक अरबाजलाही ओळखत होता, म्हणून त्याने त्याला स्वतंत्रपणे आमंत्रित केले. आर्यन अरबाजसोबतची मैत्री नाकारत नाही पण इतर सर्व गोष्टींशी त्याचा संबंध नाही. पाच दिवसाच्या एनसीबी कस्टडीमध्ये आणि चौकशी दरम्यान काहीही समोर आलेले नाही, मग एनसीबीला आर्यनच्या पुन्हा कोठडीची गरज का आहे? आर्यनविरोधात काही पुरावा मिळाला तर पुन्हा चौकशीसाठी बोलावू शकतात, असे सांगत मानेशिंदे यांनी आर्यनला एनसीबी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. त्यावर न्यायाधीश आर. एम. निर्लेकर यांनी आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमून धामेचा, नुपूर सतीजा, इस्मित सिंह चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमीत चोप्रा आणि विक्रांत छोकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आर्यन खानसह इतर आरोपींच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून उद्या त्यावर सुनावणी होणार आहे.

  • काय आहे नेमके प्रकरण? -

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या 'कॉर्डिया द क्रूझ'वर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस, २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमून धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले होते. यामधील आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धामेचा या तीन जणांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची एनसीबी कोठडी देण्यात आली होती. सोमवारी पुन्हा आठ जणांना न्यायालयात हजर केले असता ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली होती. या प्रकरणी अद्याप १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - होय... गोसावी-भानुशालीच्या माहितीच्या आधावरच क्रूझवर केली कारवाई, एनसीबीचा खुलासा

  • आजची रात्र एनसीबी कोठडीत -

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड (किल्ला कोर्ट) यांच्या कोर्टाचे न्यायाधीश आर. एम.निर्लेकर यांनी आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा यांच्यासह आठ आरोपीना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. हा निकाल देईपर्यंत उशीर झाला असल्याने जेल प्रशासन रात्री आरोपींना जेलमध्ये घेणार नाहीत. उद्या, शुक्रवारी सकाळी सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यासाठी या आरोपींना आज रात्री एनसीबी कोठडीत ठेवण्यात यावे अशी मागणी आर्यन खानचे वकील मानेशिंदे यांनी न्यायालयाकडे केली. त्याला न्यायालयाने सहमती दर्शवल्याने आर्यन खानला आजची रात्र एनसीबी कोठडीत घालवावी लागणार आहे.

Last Updated : Oct 8, 2021, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.