ETV Bharat / city

होय... गोसावी-भानुशालीच्या माहितीच्या आधावरच क्रूझवर केली कारवाई, एनसीबीचा खुलासा

author img

By

Published : Oct 6, 2021, 7:25 PM IST

Updated : Oct 6, 2021, 7:53 PM IST

एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. के. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्या माहितीचा आधारवर २ ऑक्टोबर २०२१ रोजी कार्डिया द क्रुझवर छापा टाकला होता. या कारवाईत त्याची आम्हाला मदत मिळाली आहे. या कारवाईत बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण आठ जणांना क्रुझवरुन अटक केली आहे. त्यांच्या जवळून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे.

क्रूझc
क्रूझ

मुंबई - कार्डिया क्रुझवरील ड्रग्स पार्टीची कारवाई बोगस आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला पकडणारे अधिकारी हे एनसीबीचे नसून, ते भाजपाचे पदाधिकारी असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपात तथ्य नसल्याचा एनसीबीने खुलास करत क्रूझवर केलेली कारवाई नियमानुसार केली आहे. तसेच या कारवाईत आर्यन खानसह आठ आरोपींना ड्रग्ससहित ताब्यात घेतले. के. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती एनसीबीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

माहिती देतांना एनसीबीचे अधिकारी




'एनसीबीची पूर्ण कारवाई सर्व नियमानुसार'

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या आरोपानंतर काही तासातच एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. के. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्या माहितीचा आधारवर २ ऑक्टोबर २०२१ रोजी कार्डिया द क्रुझवर छापा टाकला होता. या कारवाईत त्याची आम्हाला मदत मिळाली आहे. या कारवाईत बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण आठ जणांना क्रुझवरुन अटक केली आहे. त्यांच्या जवळून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस आणि २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. मोहन जेस्वालची प्राथमिक चौकशी केल्यानंतर जोगेश्वरी आणि गोरेगावमध्ये धाड टाकली होती. या कारवाईत अब्दुल शेखसह तीन आरोपीना अटक केली आहे. त्यांच्याकडूनही अमली पदार्थ सापडून आले होते. याशिवाय कार्डिया द क्रुझवरचा ड्रग्ज पार्टीचा चौकशीत इव्हेंट मैनेजमेंटमधील समीर सैगल, गोपाळ आंदन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल या चार जणांना अटक केली आहे. ही संपूर्ण कारवाई पूर्णपणे पारदर्शक आणि नियमानुसार सुरु आहे. आमच्या कारवाईवर केलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याची माहिती एनसीबीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

नवाब मलिकचे आरोप -

मुंबई ते गोवा जाणाऱ्या कार्डीला क्रूझवर शनिवारी रात्री एनसीबीने कारवाई करत क्रूझवर चालणारी ड्रग्स पार्टी उधळली होती. या धाडी दरम्यान आर्यन खान याला के. पी. गोसावी याने तर अरबाज मर्चंटला भाजपाचा पदाधिकारी असलेला मनीष भानुशाली यांनी पकडून आणले होते. त्याबाबतचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. त्या व्हिडिओमध्ये हे दोन खासगी लोक स्पष्ट दिसत आहेत. आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. तो के.पी.गोसावी नावाचा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याची बाब खुद्द एनसीबीने सांगितली आहे. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपाचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाइल लोकांना अटक केली. याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे, असा सणसणाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

हेही वाचा - Cruise Drug Case : अरबाज मर्चंटला ताब्यात घेणारा भाजपचा नेता; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

Last Updated : Oct 6, 2021, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.