ETV Bharat / city

Mumbai Corona Update - मुंबईत नवीन १२८ कोरोना रुग्णांची नोंद तर मुंबईत कोरोनामुळे आज एकाचा मृत्यू

author img

By

Published : Sep 12, 2022, 8:44 PM IST

मुंबईत आज नवीन १२८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या १६६६ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार आता कमी होत आहे. मुंबईत आज नवीन १२८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या १६६६ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

१२८ नवे कोरोना रुग्ण - मुंबईत आज १२ सप्टेंबरला ६,२०६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२८ रुग्णांची नोंद झाली. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. १७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४८ हजार १०६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २६ हजार ७२१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १६६६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३२०३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२२ टक्के इतका आहे.


मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घटतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४, ४ सप्टेंबरला ३७६, ५ सप्टेंबरला १७३, ६ सप्टेंबरला २८५, ७ सप्टेंबरला ३१६, ८ सप्टेंबरला २९०, ९ सप्टेंबरला २५१, १० सप्टेंबरला २०९, ११ सप्टेंबरला १८७, १२ सप्टेंबरला १२८ रुग्णांची नोंद झाली आहे.


१२१ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १२१ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात २ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.