ETV Bharat / city

तो मी नव्हेच... उमेश कामतने राज कुंद्रा प्रकरणात बेजबाबदार माध्यमांना दिला कारवाईचा इशारा

author img

By

Published : Jul 22, 2021, 1:42 PM IST

Updated : Jul 23, 2021, 5:26 PM IST

कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. असा इशारा उमेश कामतने दिला आहे.

उमेश कामत
उमेश कामत

मुंबई - पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात अटक झालेला उद्योजक राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर नवनवीन माहिती समोर येत आहे. याच प्रकरणाशी निगडीत अटकेत असलेल्या उमेश कामत याच्यासोबतचे चॅट समोर आले आहे. मात्र, यामुळे चर्चेत आलेल्या आरोपी उमेश कामतचे नाव पुढे येताच प्रसारमाध्यमांकडून मराठी चित्रपट अभिनेता उमेश कामत याचा फोटो दाखवला आहे. त्यामुळे अभिनेता उमेश कामतने सोशल मीडियातून बेजबाबदार पत्रकारिता म्हणत संताप व्यक्त केला आहे. तसेच या माध्यमांवर कारवाई करण्याचा इशाराही त्याने दिला आहे..

काय आहे प्रकरण-

मुंबईतील मढ येथील एका बंगल्यावर छापा मारून पोर्नोग्राफी चित्रीकरण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीत राज कुद्रा याचा माजी पीए म्हणून काम पाहणाऱ्या उमेश कामत या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राजकुद्रा याला अटक झाल्यानंतर उमेश कामत आणि राज कुंद्रा या दोघांतील संभाषण समोर आले आहे. त्यानंतर माध्यमांनी आरोपी उमेश कामत याचा फोटो वापरण्याऐवजी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता उमेश कामत याचा फोटो आरोपी उमेश कामत म्हणून प्रसारीत केला. त्यावर अभिनेता उमेश कामत यांने संताप व्यक्त केला.

काय म्हणाला उमेश कामत?

“आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये या प्रकरणातील एक आरोपी उमेश कामत याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन” असा इशारा अभिनेता उमेश कामतने सोशल मीडियावरुन दिला आहे.

कोण आहे अभिनेता उमेश कामत?

उमेश कामत हा मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. 2002 मध्ये आभाळमाया मालिकेतून त्याने कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर वादळवाट, असंभव, ह्या गोजिरवाण्या घरात, शुभमकरोति, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट यासारख्या मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकांत झळकला. सध्या अजूनही बरसात आहे मालिकेत तो मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रख्यात अभिनेत्री प्रिया बापटसोबत तो 2011 मध्ये विवाहबंधनात अडकला.

Last Updated :Jul 23, 2021, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.