ETV Bharat / city

Maharashtra weather forecast आज गडचिरोलीत मुसळधार पावसासह या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

author img

By

Published : Aug 16, 2022, 11:19 AM IST

आज 16 ऑगस्ट रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Maharashtra weather forecast
हवामान महाराष्ट्र

मुंबई राज्यात मान्सूनने आपले रौद्ररूप दाखवणे Maharashtra weather forecast सुरू केले आहे. गेल्या महिन्यात विदर्भात जोरदार पाऊस आला होता. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूर आला होता. यात घरांचे नुकसान झाले होते आणि शेतीही Maharashtra rain पाण्याखाली आली होती. त्यानंतर काही दिवसांनी वर्धा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसला. पावसाने विदर्भाला Vidarbha rain चांगलेच झोडपून काढले. मुंबई, पुणे नाशिकमध्येही पाऊस बरसला. दरम्यान, आज 16 ऑगस्ट रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा Netaji Subhash Chandra Bose नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अवशेष भारतात परत आणण्याची मुलगी अनिता बोस फाफ यांची मागणी

राज्यात या ठिकाणी पावसाची शक्यता पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावासाचा फटका बसला आहे. विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये या महिन्यात जोरदार पाऊस बरसला असून आज गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच, नंदुरबार, नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांत मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने वर्तवली आहे.

  • 16 Aug, Latest satellite obs at 10.45hrs:Palghar, Nandurbar,Nashik,Thane,Dhule,Jalgaon watch for mod to intense spells for next 3,4 hrs
    Mumbai intermittent intense spells for next 2,3 hrs
    Pune & Satara Ghats &parts of adj S Konkan areas watch for mod-intense spells next 2,3 hrs pic.twitter.com/thxNCn1q9b

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


देशात या ठिकाणी पावासाची शक्यता पुढील २४ तासांत मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ईशान्य भारत, छत्तीसगडचा काही भाग, ओडिशा, महाराष्ट्र, राजस्थानचा उर्वरित भाग, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, किनारी आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा FIFA Suspends AIFF अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला FIFA ने केले निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.