ETV Bharat / city

देवेंद्रला अमृताची दृष्ट लागली, कशी नशिबाने थट्टा.. किशोरी पेडणेकरांचा अमृता फडणवीसांना गाण्यातून चिमटा

author img

By

Published : Aug 7, 2022, 2:28 PM IST

Updated : Aug 8, 2022, 6:14 AM IST

एका टीव्हीशो मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Kishori Pednekar on Amruta Fadnavis ) यांनी माजी मुख्यमंत्री, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Amruta Fadnavis fadnavis song ) यांना टोला लगावला होता. त्यावर मुंबईच्या माजी महापौर ( Amruta Fadnavis comment on uddhav thackeray ) तथा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्याला गाण्यातून उत्तर देत चिमटा ( Kishori Pednekar criticize amruta fadnavis with song ) घेतला आहे.

Kishori Pednekar on Amruta Fadnavis
अमृता फडणवीस यांच्यावर किशोरी पेडणेकर यांची गाण्यातून टीका

मुंबई - एका टीव्हीशो मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Kishori Pednekar on Amruta Fadnavis ) यांनी माजी मुख्यमंत्री, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Amruta Fadnavis fadnavis song ) यांना टोला लगावला होता. "कशी नशिबाने थट्टा आज मांडली" हे मराठी चित्रपटातील गाणे ऐकल्यानंतर तुम्हाला कोणाची आठवण होते? असा प्रश्न निवेदकाने अमृता फडणवीस यांना विचारले असता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आठवण आपल्याला होते, असे उत्तर अमृता फडणवीस यांनी दिले होते. त्यावर मुंबईच्या माजी महापौर ( Amruta Fadnavis comment on uddhav thackeray ) तथा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्याला गाण्यातून उत्तर देत चिमटा ( Kishori Pednekar criticize amruta fadnavis with song ) घेतला आहे.

गाणं गाताना शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर

हेही वाचा - Har Ghar Tiranga : सीएसटी स्थानकावर रोषणाई, 'हर घर तिरंगाव'र पहा जनतेच्या प्रतिक्रिया

अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गाण्यातून चिमटा काढला होता. मात्र, शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही अमृता फडणवीस यांच्या या गाण्याला गाण्याने उत्तर दिले. मात्र, कोणत्याही चित्रपटातलं गाणं त्यांनी न गाता शिवसैनिकांनी लिहिलेले एक गाणं किशोरी पेडणेकर यांनी गायले. ज्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले, असा चिमटा या गाण्यातून काढण्यात आला आहे. 27 जुलै रोजी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील डिलाईल रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर यांनी हा चिमटा अमृता फडणवीस यांना काढला.

मुंबईकर आणि शिवसेनेचा डीएनए कोणीही बदलू शकत नाही - राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा नवीन प्रभाग रचनेचा निर्णय स्थगित करण्यात आला असून, 2019 नुसार असलेल्या प्रभाग रचणेप्रमाणे महापालिकेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्यासाठी हा निर्णय बदलला गेला असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. तसेच, असा प्रयत्न होत असला तरी मुंबईकर आणि शिवसेनेचा डीएनए कोणीही बदलू शकत नाही, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्ली वाऱ्या - मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकारचा काय सावळागोंधळ सुरू आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र बघत असल्याचा टोलाही पेडणेकर यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सतत दिल्ली वार्‍या करत होते. त्याचप्रमाणे आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मंत्रिमंडळ विस्तार व्हावा यासाठी सातत्याने दिल्ली वार्‍या करत असल्याचा चिमटा किशोरी पेडणेकर यांनी काढला.

पक्षप्रमुख पद आदित्य ठाकरेंकडे दिले तर त्यात गैर काय? - शिवसेना पक्षप्रमुख पद आदित्य ठाकरे यांच्याकडे, तर युवा सेना अध्यक्ष म्हणून तेजस ठाकरे कार्यभार सांभाळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्षप्रमुख पद दिले तर त्यात गैर काय? याबाबत शिवसैनिकांना कोणताही आक्षेप नाही. तसेच, इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची किंवा पक्षाध्यक्ष यांची मुले त्या त्या पक्षात काम करतात, पक्षाची धुरा सांभाळतात. आदित्य ठाकरे यांनी तर वयाच्या सतराव्या वर्षापासून शिवसेनेसाठी काम करायला सुरुवात केली. त्यामुळे, शिवसैनिकांचा त्यांना कोणताही आक्षेप नाही. तसेच, तेजस ठाकरे यांनीही शिवसेनेत सक्रिय काम करण्यास सुरुवात केली, त्यात काहीही वावगे नाही. मात्र, तेजस ठाकरे यांच्याबाबत पक्षात सक्रिय होण्याबाबत कोणतीही चर्चा नसल्याचेही किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.

अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंकडून धडे घ्यावेत - सध्याची राजकीय परिस्थिती घडली नसती तर आदित्य ठाकरे यांनी एवढे राजकीय दौरे काढले असते का? असा चिमटा अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना काढला होता त्यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, अमित ठाकरे हे आत्ताच राजकारणात सक्रिय झाले आहेत. आता त्यांनी कुठे फिरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, काम कसे करावे याचे धडे अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडून घ्यावेत.

हेही वाचा - Modi Express : कोकणातील नागरिकांसाठी खुशखबर; नितेश राणेंकडून गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस'ची घोषणा

Last Updated :Aug 8, 2022, 6:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.