ETV Bharat / city

मुंबईत वाढते सेक्सटॉर्शनचे जाळे, सायबर क्राईमचा मुंबईत वाढता आलेख

author img

By

Published : Sep 21, 2022, 10:21 PM IST

सायबर क्राईमचा मुंबईत वाढता आलेख दिवसेंदिवस चढतच चालल्याचे दिसून आले आहे. मुंबईत वाढते सेक्सटॉर्शनचे जाळे Growing Sextortion Network in Mumbai निर्माण होत असल्याचेही आकडेवारीवरुन दिसते. मुंबई शहरात सायबर क्राईम वाढत असल्याने पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर सायबर एक्सपर्टनींही काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. Cybercrime on the rise in Mumbai

वाढतं सेक्सटॉर्शनचे जाळे सायबर क्राईमचा मुंबईत वाढता क्रम
वाढतं सेक्सटॉर्शनचे जाळे सायबर क्राईमचा मुंबईत वाढता क्रम

मुंबई - सेफ टू युज अनसेफ टू मिसयूज असा काहीसा इंटरनेट वापराचा मंत्र आहे. इंटरनेट वापरामुळे सध्या सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर वाढले आहे (Growing Sextortion Network in Mumbai). संगणक संबंधातील गुन्हे, खोटे प्रोफाइल मॉर्फिंग, क्रेडिट कार्ड ऑनलाइन फ्रॉड, डेटा चोरी सेक्सटॉर्शन, जातीय तेढ पसरवण्यासाठी पोस्ट करणे असे सायबर क्राईमचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत (Cybercrime on the rise in Mumbai). त्यामुळे पोलिसांकडून अनेकदा नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले जाते. याचाच ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा.

पैसे उकळण्याचे सर्वाधिक वापरले जाणारे शस्त्र म्हणजे सेक्सटॉर्शन. फेसबुक, व्हाट्सअपवर अज्ञात व्यक्तीशी ओळख करून नंतर व्हिडिओ कॉल आला तर जरा विचार करा कॉल लगेच स्वीकारू नका. जर व्यक्ती ओळखीची असेल तर त्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारून ओळखीच्या व्यक्तीचाच कॉल स्वीकारा. कारण व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना विवस्त्र असल्याचे भासवून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जाण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. या पद्धतीत पोलीस, पत्रकाराच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. सायबर गुन्हेगार यासाठी विशेष करून पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींना आपलं टार्गेट करत असल्याचं दिसत आहे.

वर्ष गुन्हे
२०१७ १४३६
२०१८ १४९३
२०१९ २६०९
२०२० २४९९
२०२१ २८८३
२०२२ ३३०

अलीकडेच मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, प्राप्तिकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त गीता रविचंद्रन, श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी म्हणजेच एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव यांचे मोबाईल क्रमांक हॅक करून त्यांचा डीपी ठेवून परिचयातील व्यक्ती सहकारी कर्मचारी यांना गिफ्ट व्हाउचरचे संदेश पाठवण्यात आल्याची ताजी उदाहरणं आहेत. या संदेशांमध्ये लिंक पाठवून ती क्लिक करण्यास सांगण्यात आले होते. अशा प्रकारे परिचित व्यक्तींचा मोबाईल क्रमांक असल्याचे भासवून त्यांचा फोटो वापरून खोटी ओळख निर्माण करून फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्रामप्रमाणे आता व्हाट्सअपच आहे. अशा प्रकारे गुन्हेगारीसाठी या सोशल मीडियाचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे वरवरच्या अशा खोट्या माहितीला भुलून जाऊ नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुंबईतील सायबर गुन्हे : विस्तृत आकडेवारी

वर्ष २०२१
गुन्ह्याचा प्रकार दाखल गुन्हे उकल अटक आरोपी
संगणक संबंधातील १३ ०५ ०७
फिशिंग, स्पूफिंग ४९ ११ ३३
पोर्नोग्राफी ४३ २५ ३३
अश्लील संदेश, मेल १४२ ७६ ८८
खोटे प्रोफाइल, मॉर्फिंग ११८ ३६ ३७
क्रेडिट कार्ड, ऑनलाइन १०७५ ४८ ७१
हॅकिंग ३२ ०२ ०३
फसवणूक ११५४ १४० २९४
डेटा चोरी २० ०८ २०
सेक्सटॉर्शन ५४ ३० ५२
जातीय तेढ पोस्ट १७ ०७ २३
इतर १६६ ६७ १०७

वर्ष २०२२
गुन्ह्याचा प्रकार दाखल गुन्हे उकल अटक आरोपी
संगणक संबंधातील ०७ ०० ००
फिशिंग, स्पूफिंग ३० ०२ ०६
पोर्नोग्राफी २० ०३ ०३
अश्लील संदेश, मेल २६२ ५३ ७३
खोटे प्रोफाइल, मॉर्फिंग ८९ १४ २०
क्रेडिट कार्ड, ऑनलाइन ९८२ १३ १६
हॅकिंग ४९ ०३ ०९
फसवणूक १५०३ ४९ ८५
डेटा चोरी १० ०३ ०३
सेक्सटॉर्शन ६१ १४ २३
जातीय तेढ पोस्ट ०३ ०१ ०१
इतर २८५ २७ ४७

सायबर एक्सपर्ट वकील प्रशांत माळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, सध्या सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सायबर क्राईमच्या एक प्रकार म्हणजे सेक्सटॉर्शनचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असला पाहिजे पोलिसांनी त्यांना अद्दल घडवली तरच ते गुन्हेगार वटणीवर येऊ शकतात. पोलिसांच्याच पोलिसांचा फोटो आणि ओळख वापरून हे गुन्हेगार जर सायबर क्राईम करत असतील तर पोलिसांनी आपल्या खाक्या यांना दाखवल्या पाहिजे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लोकांनी देखील सतर्क राहणं महत्त्वाचं आहे. आपल्या व्हाट्सअपवर अज्ञात स्त्रीकडून मेसेज आला किंवा व्हिडिओ आला तर तो ओपन न करता व्हिडिओ तो नंबर ब्लॉक करा आणि व्हाट्सअप किंवा फेसबुकवर येणाऱ्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून समोरील व्यक्तीने नग्न होण्यास किंवा हस्तमैथुन करण्यास सांगितल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती कळवा. फेसबुकवर मैत्री करताना खूप सतर्क रहा. अज्ञात व्यक्तीशी ओळख किंवा फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारताना हजारदा विचार करा. एखाद्याने तुम्हाला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली तर त्या फेसबुक प्रोफाईल विषयी माहिती घ्या. त्या फेसबुक प्रोफाईलमध्ये फ्रेंड्समध्ये अधिकाधिक पुरुष असतील आणि स्त्रिया कमी असतील किंवा ओळखीतले मित्र त्यांच्या लिस्टमध्ये नसल्यास ती आलेली रिक्वेस्ट स्वीकारताना अनेकदा विचार करा. त्याचप्रमाणे एखादे फेसबुक प्रोफाईल जर लॉक असेल तर त्याची माहिती मिळणं मुश्किल आहे. तर त्यावेळी अज्ञात व्यक्तीकडून आलेली फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारणं टाळणंच फायदेशीर ठरू शकतं अशी माहिती प्रशांत माळी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.